Sai Tamhankar Play Important Role In Farhan Akhtar Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Farhan Akhtar On Sai Tamhankar: ‘मिमी’नंतर सईकडे आणखी एक बॉलिवूड चित्रपट, नोट शेअर करत दिली चाहत्यांना ‘गुड न्यूज’

Farhan Akhtar And Sai Tamhankar New Movie: सई ताम्हणकर ‘मिमी’नंतर पुन्हा एकदा बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Chetan Bodke

Sai Tamhankar Play Important Role In Farhan Akhtar Movie

मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक समजली जाणारी सई ताम्हणकर सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि तिच्या हटक्या फॅशनची चर्चा मराठी सिनेसृष्टीत कायम असते.

कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहणारी सई यावेळी तिच्या आगामी चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे. सईने मराठी चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. क्रितीच्या ‘मिमी’मध्ये सईने देखील प्रमुख भूमिका साकारली होती.

त्या चित्रपटाकरिता सईला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारानं गौरविण्यात आले होतं. त्या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर सई पुन्हा एकदा बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

सई कायमच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांसोबत कायमच वेगवेगळी माहिती शेअर करत असते. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक नोट शेअर केली आहे. या माध्यमातून तिने आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. पण सई नेमकी कोणत्या आगामी चित्रपटात दिसणार हे तरी सध्या गुलदस्त्यात आहे.

सईने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये दिग्दर्शक फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी पाठवलेल्या पत्राचा खास फोटो शेअर केला आहे, अभिनेत्रीच्या ह्या स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

त्या नोटमध्ये दिग्दर्शक फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी लिहिलेल्या नोटमध्ये, “प्रिय सई, तुझ्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे. आमच्या नव्या टीममध्ये तुझे मनापासून स्वागत... लवकरच तुझ्यासोबत एका नव्या प्रवासाला सुरूवात करत आहोत. आम्हाला आनंद आहे.” असं लिहिलेलं आहे. त्या नोटच्या खालच्या भागामध्ये एक्सेल एंटरटेनमेंटचा लोगो व्यवस्थित दिसत असून अभिनेत्रीने चित्रपटाचं अद्याप नाव सांगितलेलं नाही.

Sai Tamhankar Play Important Role In Farhan Akhtar Movie

जरीही सईने चित्रपटाचं नाव जरी नसेल सांगितलं, तरी सुद्धा सध्या सोशल मीडियावर दोन चित्रपटांची तुफान चर्चा होताना दिसत आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन ३’ आणि मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुक्रे ३’ मध्ये सई दिसणार अशी सध्या चर्चा होत आहे. एक्सेल एंटरटेनमेंटकडे हे दोन्हीही चित्रपट असून सई नेमकी कोणत्या चित्रपटामध्ये दिसणार याची माहिती गुलदस्त्यात आहे. सई यापूर्वी ‘मिमी’, ‘गजनी’ आणि ‘हंटर’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT