Musician Passes Away: जगप्रसिद्ध संगीतकाराचे निधन; वयाच्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

Musician Death: लिंप बिझकिटया मेटल बँडचे बासिस्ट सॅम रिव्हर्स यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे. बँडने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली आहे.
Limp Bizkit band bassist Sam Rivers passes away at the age of 48 on 19 September
Limp Bizkit band bassist Sam Rivers passes away at the age of 48 on 19 SeptemberSaam tv
Published On

Musician Passes Away: लिंप बिझकिटया मेटल बँडचे बासिस्ट सॅम रिव्हर्स यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे. बँडने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली आहे. रिव्हर्स यांनी मधल्या काळापासून यकृताचा गंभीर आजार सुरु झाला होता.

बँडने मृत्यूची पुष्टी केली

बासिस्ट सॅम रिव्हर्सच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, अलिकडच्या काळात त्यांना गंभीर यकृताचा आजार आणि २०१७ मध्ये प्रत्यारोपणासह आरोग्य समस्या होत्या. बँड लिंप बिझकिटने त्यांच्या निधनाची घोषणा केली.

Limp Bizkit band bassist Sam Rivers passes away at the age of 48 on 19 September
Box office collection: 'कांतारा १' ने पार केला ५०० कोटींचा टप्पा; 'सनी संस्कार...'च्या कमाईत घट, कलेक्शनचा आकडा किती?

बँडने इंस्टाग्राम पोस्टद्वारे दुःख व्यक्त केले

बँडने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटद्वारे सॅमच्या निधनाची माहिती दिली. लिंप बिझकिट म्हणाले, "आज आम्ही आमचा भाऊ गमावला. आमचा बँडमेट. आमचा हृदयाचा ठोका." पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, "सॅम रिव्हर्स फक्त आमचा बास वादक नव्हता, तो जादूगर होता. प्रत्येक गाण्यामागील नाडी, गोंधळात शांती, आत्म्याचा आवाजा.

Limp Bizkit band bassist Sam Rivers passes away at the age of 48 on 19 September
Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

'तुमचे संगीत कधीही संपणार नाही'

बँडच्या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, "आम्ही अनेक क्षण एकत्र साजरा केले, काही मजा, काही शांत, काही सुंदर, आणि प्रत्येक क्षण अधिक अर्थपूर्ण होता कारण सॅम तिथे होता. तो असा माणूस होता जो तुम्हाला आयुष्यात फक्त एकदाच भेटतो. तो एक खरा व्यक्ती होता. त्याचा आत्मा प्रत्येक तालात, प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक आठवणीत जिवंत राहील. तुझे संगीत कधीही संपणार नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com