Khufiya Trailer: अंगावर रोमांच उभा करणारा ‘खुफिया’चा भारदस्त ट्रेलर प्रदर्शित, तब्बूसह अली फजलच्या भूमिकेने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Khufiya Trailer News: विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘खुफिया’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
Khufiya Trailer
Khufiya TrailerYou Tube

Khufiya Trailer Shared On Social Media

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘खुफिया’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच ट्रेलरची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

Khufiya Trailer
Marathi Movie Poster: प्रसाद खांडेकर यांची खुशखुशीत मेजवानी; 'एकदा येऊन तर बघा'चं मोशन पोस्टर प्रदर्शित

या स्पाय थ्रिलर चित्रपटामध्ये, मुख्य भूमिकेत तब्बू, अली फजल आणि वामिका गब्बी दिसणार आहे. ‘भोला’ चित्रपटाच्यानंतर तब्बू पुन्हा एकदा एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली. या चित्रपटाद्वारे तब्बू ओटीटीवर खळबळ माजवणार आहे. या चित्रपटाची कथा अमर भूषण यांच्या ‘एस्केप टू नोव्हेअर’ या पुस्तकातून घेण्यात आली आहे. चित्रपटामध्ये तब्बूने गुप्तहेराचे पात्र साकारले. मोहिमेमध्ये तब्बू भारताचे सिक्रेट विकणाऱ्या गुप्तहेराचा शोध घेताना दिसणार आहे.

Khufiya Trailer
Mouni Roy Video: मौनी रॉयचा मिनी ड्रेसमध्ये हॉट अंदाज, डान्स करतानाचा VIDEO आला समोर

चित्रपटामध्ये अली फजलने देवचे पात्र साकारले आहे. पण रॉच्या टीमला देव देशद्रोही असल्याचा संशय आहे. पण असं असलं तरी अभिनेत्याच्या संवादाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तो म्हणतो, ‘माझी विचारधारा देशातल्या नागरिकांपेक्षा फार वेगळी आहे. हा माझा गुन्हा असला तरी, मी देशद्रोही नाही. मी कट्टर देशभक्त आहे.’

ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते तब्बूवर आणि चित्रपटावर प्रचंड खूश दिसत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात, ‘आमचा ऑक्टोबर महिना खूप झकास जाणार आहे.’ तर, आणखी एकजण म्हणतो, ‘तब्बूचा दमदार अभिनय आहे, अभिनेत्रीचा लूक पाहून खूपच उत्सुकता आहे.’ तर आणखी एका युजरने प्रतिक्रिया दिली की, ‘आम्ही आता जास्त थांबू शकत नाही, चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहोत.’

Khufiya Trailer
Thalapathy Vijay Movie Poster: 'शांत राहा आणि संघर्ष टाळा...' थलापती विजयच्या 'लिओ' चित्रपट पोस्टर प्रदर्शित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com