Renuka Shahane Post Twitter
मनोरंजन बातम्या

Renuka Shahane Post : "....तर त्यांना मत देऊ नका"; 'नोकरीत मराठी माणूस नको'च्या पोस्टनंतर रेणुका शहाणेने व्यक्त केला संताप

Renuka Shahane : मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेने 'नोकरीत मराठी माणूस नको' या पोस्टच्या वादात आता उडी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

Chetan Bodke

मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही, अशी पोस्ट गेल्या काही दिवसांपूर्वी फ्रीलान्स एचआर रिक्रुटरने सोशल मीडियावर केली. एका ग्राफिक कंपनीसाठी मुंबईमध्ये ग्राफिक डिझायनर हवा यासाठी ही पोस्ट करण्यात आली होती, पण या नोकरीसाठी मराठी व्यक्ती चालणार नसल्याचं पोस्टमध्ये एचआरने म्हटलं होतं.

जॉब व्हॅकेन्सीचीही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर फ्रीलान्स रिक्रुटरने माफी मागितली आहे. या प्रकरणी सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेही या वादात उडी घेतली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

सध्या सर्वत्र निवडणूकीचे वारे वाहत आहे, त्यामुळे अभिनेत्रीचीही पोस्ट कमालीची चर्चेत आली आहे. रेणुका शहाणे कायमच आपल्या विधानांमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. ती कायमच सोशल मीडियावर सामाजिक, राजकीय विषयांवर आपले मत मांडण्याचा प्रयत्न करते. अभिनेत्रीने नुकतंच ट्वीट केलेले आहे. तिने ट्वीटमध्ये लिहिलंय की, "मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका."

"ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे." असं अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. सध्या रेणुका शहाणेच्या ट्वीटची जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानने वाचवला होता जीव; आज 'तो' आहे IPS ऑफिसर, नेमका किस्सा काय?

Hairstyle Ideas: मकर संक्रांतीला काळ्या साडीवर खुलून दिसतील 'या' 5 हेअरस्टाईल्स; पारंपारिक लूकला मिळेल मॉडर्न टच

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

SCROLL FOR NEXT