Priya Bapat News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priya Bapat: मराठमोळ्या अभिनेत्रीने ऐश्वर्याला टाकलं मागे; IMDB लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत पटकावला दुसरा क्रमांक

Priya Bapat Imdbs Most Popular Indian Celebrities: प्रियाने बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत दमदार कामगिरी केली आहे. लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत प्रिया बापटची गणना झाली आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्रिया बापट मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. प्रियाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत तिचं अनोखं स्थान निर्माण केलं आहे. प्रियाच्या सिटी ऑफ ड्रीम्स वेब सीरिजला प्रेक्षकांची खास पसंती मिळाली. आता प्रियाने बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत दमदार कामगिरी केली आहे. लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत प्रिया बापटची गणना झाली आहे.

प्रियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅडलवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. प्रियाने तिचा फोटो पोस्ट करत, "लोकप्रिय आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत या आठवड्यात मी दुसऱ्या स्थानावर आहे याचा मला खूप आनंद आहे. यासाठी मी आयएमडीबीचे मनापासून आभार मानते" असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर प्रियाच्या या पोस्टवर सर्वांकडून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

"प्रत्येक कलाकाराचं टॅलेंट आणि मेहनतीला आयएमडीबीकडून एक पोचपावती मिळते. माझ्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते. या वर्षी प्रदर्शित होत असलेल्या माझ्या प्रोजेक्ट्ससाठी मी खूप उत्सुक आहे. त्यावर देखील प्रेक्षक आणि चाहते खूप प्रेम करतील अशी मला खात्री आहे."

नुकतीच IMDB टॉप कलाकारांची यादी जाहीर झाली आहे. या कलाकारांच्या यादीमध्ये मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. ईशान खट्टरनं सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. तर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, करिना कपूर आणि शाहरूख खान आणि सलमान खान तिसऱ्या , चौथ्या, सहाव्या क्रमांकावर आहेत. अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या आगामी चित्रपट विकी विद्या को वाला वीडियोसाठी आठव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT