Entertainment News
Bigg Boss MarathiSaam Tv

Bigg Boss Marathi: कोण सांगकाम्या अन् कोण मालक? नव्या टास्कमुळे बिग बॉसच्या घरात सुरू झालाय कल्ला

Bigg Boss Marathi New Task: बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. बिग बॉसच्या घरात नवा टास्क पार पडणार आहे.
Published on

'बिग बॉस मराठी' हा छोट्या पडद्यावरील खेळ प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो. घरातील हा नवा खेळ पाहण्यासाठी 'बिग बॉस' प्रेमी खूप उत्सुक आहेत.

Entertainment News
Paris Fashion Week 2024: पॅरिसच्या रेड कार्पेटवर अवतरल्या बॉलिवूडच्या तारका; दाखवला फॅशनचा 'जलवा'

नुकताच बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"या आठवड्यात आपल्यातील काही सदस्य ठरतील सांगकामे आणि उर्वरीत सदस्य ठरतील त्यांचे मालक. मालकांनी सांगितलेली त्यांची वैयक्तिक कामेसुद्धा त्यांना करावी लागतील". त्यामुळे आज घरात रंगत येणार आहे. कोण कोणाला काय कामे देणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात निक्की, अभिजीत, डीपी दादा आणि अंकिता एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहे. निक्की म्हणतेय,"तिकीट टू फिनाले म्हणजे काय टॉप 5.". त्यावर डीपी दादा म्हणतात,"मी तुला टॉप 5 मध्ये पाहतोय". निक्की म्हणते,"माझं तुम्हाला सांगणं हे कर्तव्य आहे". डीपी दादा पुढे निक्कीला म्हणतात,"जसं तुला वाटतंय ना हा व्यक्ती घरात करतोय काय? कशासाठी आलाय". त्यावर निक्की म्हणते,"मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतेय तुम्ही काल माझं तिकीट टू फिनाले काढलं...पण त्यासाठी तुम्ही दिलेलं कारण हीच माझी समस्या आहे".

Entertainment News
Hina Khan: हिना खान येताच कार्तिकनं केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com