Jar Tar Chi Goshta 100th Shows Instagram
मनोरंजन बातम्या

Jar Tar Chi Goshta: प्रिया- उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाचा शंभरावा प्रयोग सादर, अभिनेत्रीच्या आवाजतलं गाणंही रिलीज

Jar Tar Chi Goshta 100 Theater: गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या नाटकाचे नुकताच १०० वा प्रयोग सादर करण्यात आला आहे.

Chetan Bodke

Jar Tar Chi Goshta 100th Shows

मराठी टेलिव्हिजनसृष्टीतलं ‘क्यूट कपल’ म्हणून सर्वत्र प्रिया बापट आणि उमेश कामत ओळखले जातात. दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असताना प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या नाटकाचे नुकताच १०० वा प्रयोग सादर करण्यात आला आहे. त्यासोबतच नाटकाचं टायटल साँगही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

आजवर ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या नाटकाच्या अनेक प्रयोगादरम्यान, नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्डही झळकला आहे. ज्या दिवशी पहिला प्रयोग सादर झाला, तेव्हाही ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला होता. नाट्यरसिकांकडून मिळण्यारा दमदार प्रतिसादानंतर आता निर्माते नाटकाचा शंभरावा प्रयोग सादर करत आहे. त्यासोबतच नाटकातील गाणंही प्रदर्शित झाले आहे. प्रिया बापटच्या आवाजातील हे सुंदर गाणं नात्यातील गुपित दर्शवणारे असून संगीतप्रेमींना हे गाणे युट्यूबसह वेगवेगळ्या म्युझिक प्ले ॲपवर ऐकायला मिळेल.

नाटकाबद्दल प्रिया बापटने सांगितले की, “आज आमच्या शंभराव्या प्रयोगचा टप्पा आम्ही गाठला आहे आणि इतर प्रयोगांप्रमाणे शंभरावा प्रयोगही हाऊसफुल्ल होता, हे सांगताना आम्हाला फारच आनंद आहे. एकाच वेळी मनात अनेक भावना आहेत. आनंद आहे, भारावले आहे, जबाबदारी आहे. या गोष्टी शब्दांत मांडणे अशक्य आहेत. परंतु एक आवर्जून सांगेल, हा पल्ला गाठणे, रसिकप्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाले. तुम्ही देत असलेले प्रेम आणि प्रतिसाद आमच्यावर असेच राहू देत. या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले असून आमच्यासह चाहत्यांसाठीही डबल ट्रीट आहे.”

फार मोठ्या गॅपनंतर हे ‘क्यूट कपल’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना रंगमंचावर एकत्र दिसत आहेत. नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेश हे ‘क्यूट कपल’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सुमारे एका दशकानंतर ही इच्छा ‘जर तर ची गोष्ट’च्या निमित्ताने पूर्ण झाली.

पाहाता पाहाता आता या नाटकाने यशाचे शिखर गाठले आहे. कौटुंबिक नाटक असल्याने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकवर्ग या नाटकाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. या नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत, प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह आशुतोष गोखले, पल्लवी अजय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

कथा, दिग्दर्शन, कलाकार हे सगळे उत्तम जुळून आल्यानेच ही सर्वोत्कृष्ट कलाकृती आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे. तर नंदू कदम ‘जर तर ची गोष्ट’चे निर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT