Pooja Sawant Reveals Her Love story  Instagram
मनोरंजन बातम्या

Pooja Sawant Lovestory: पूजा सावंतचं लग्न कसं जमलं?; ‘माझ्याही घरी इतरांप्रमाणेच...’ म्हणत अभिनेत्रीने केला लव्हस्टोरीचा खुलासा

Pooja Sawant And Siddhesh Chavan News: पुजाची आणि सिद्धेशची लव्हस्टोरी कशी जुळली?, कोणी कोणाला पहिला प्रपोज केला? अशा बऱ्याच प्रश्नाचे उत्तर तिने मुलाखतीतून दिले आहे.

Chetan Bodke

Pooja Sawant Reveals Her Lovestory

मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या प्रेमाची कबुली देत लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकतंच मराठीमोळी अभिनेत्री पुजा सावंत हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत, आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. तिचा होणारा नवरा मुळचा मुंबईकर असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. नेमकं पुजाची आणि सिद्धेशची लव्हस्टोरी कशी जुळली?, कोणी कोणाला पहिला प्रपोज केला? अशा बऱ्याच प्रश्नाचे उत्तर तिने मुलाखतीतून दिले आहे.

नुकतंच अभिनेत्री पुजा सावंतने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये पुजाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी आणि त्यांच्या लव्हस्टोरीविषयी सांगितलेय. “माझ्यासाठी आमची लव्हस्टोरी खूपच वेगळी होती. मला कधीही वाटलं नव्हतं असं आमचं लग्न जमेल. आम्ही दोघंही अरेंज मॅरेज पद्धतीत पहिल्यांदा भेटलो. मला त्याचं लग्नासाठी स्थळ आलं होतं. माझ्या आईच्या मैत्रिणीने मला त्याचं स्थळ आणलं होतं. मी जेव्हा त्याचा फोटो पाहिला तेव्हा मला तो आवडला होता आणि मी त्याला लग्नासाठी फोन केला.” (Actress)

“आईच्या म्हणण्याप्रमाणे त्याला फोन केला होता. मग तेव्हापासून आमचं बोलणं सुरु झालं. तेव्हापासून आम्ही दोघेही एकमेकांसोबत बोलतोय. आमचं बोलणं सुरू झाल्यापासून बराच वेळ घेतला. माझ्यासाठीही घटना खूपच आश्चर्यचकित करणारी ठरली. आम्ही दोघेही एकमेकांच्या हळू हळू प्रेमात पडलो. मग असा दिवस आला जेव्हा मनापासून वाटलं, याच मुलाशी आपण लग्न केलं पाहिजे.” (Marathi Film)

“अशी आमची साधी सुंदर लव्हस्टोरी आहे. सगळेच मला म्हणायचे, तु रिलेशनबद्दल इतकं काय सिक्रेट ठेवलंय? पण आम्ही रिलेशनबद्दल सिक्रेट ठेवल्यामुळे आम्हाला दोघांनीही एकमेकांना जाणुन घेण्यासाठी वेळ देता आला. आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकलो. तो वेळ फार गरजेचा होता. यानंतर जेव्हा आम्ही दोघंही लग्नासाठी तयार झालो तेव्हा आम्ही कुटुंबीयांना लग्न करायचंय असं सांगितलं.” (Social Media)

“माझ्याही घरी इतरांप्रमाणेच घडलं होतं. जेव्हा मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयात येतात तेव्हा, घरातले खूप आपल्या पाठीमागे लागतात. पण माझ्या पाठी माझे कुटुंबीय पाठी लागले नाही. त्यांनी मला कोणत्या गोष्टीसाठी फोर्स केला नव्हता. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी मला तो आवडला होता. आम्ही बरेच दिवस फक्त एकमेकांसोबत फोनवर बोललो, त्यानंतर आम्ही एकमेकांना भेटलो, एकत्र वेळ घालवला. मध्ये बराच काळ गेला आणि आता लग्न करतोय.” असं पूजाने मुलाखतीत सांगितले.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow Colour Saree: श्रावणातल्या खास सणासुदींसाठी नेसा ही पिवळ्या रंगाची आकर्षक साडी

Maharashtra Live News Update : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

Amar Kale : योजनांवर कोट्यावधीचा खर्च मात्र शिक्षणावर दुर्लक्ष; खासदार अमर काळे यांची सरकारवर टीका

सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती?|What Is The Best Time To Wake Up in the Morning

Maharashtra Politics : महायुती आणि मविआला हादरा; राज्यात नव्या आघाडीची नांदी, कुणाला फायदा अन् फटका?

SCROLL FOR NEXT