अभिनेत्री निकिता रावलचा तो व्हिडीओ व्हायरल
रेड कार्पेटवर निकिता रावलसोबत घडला धक्कादायक प्रकार
निकिता रावलला महिला चाहतीने अचानक किस केला
सेल्फी घेताना चाहतीने निकिता रावलच्या ओठांवर केलं किस
अभिनेत्री निकिता रावलसोबत रेड कार्पेटवर एक धक्कादायक घटना घडली. अभिनेत्रीसोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका महिला चाहतीने आधी तिला मिठी मारली नंतर तिच्या ओठांवर किस केले. चाहतीचं हे वागणं पाहून अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. ती क्षणभर स्तब्ध उभी राहून पाहत राहिली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
घडलं असं की, अभिनेत्री निकिता रावल एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान रेड कार्पेटवर पापाराझींसाठी पोज देत होती. त्यावेळी एक महिला चाहती अचानक तिच्याजवळ आली आणि तिने सेल्फीसाठी निकिताला विचारले. निकिता हसली आणि तिने सेल्फी देण्यासाठी होकार दिला. सेल्फी घेताना अचानक त्या चाहतीने निकीताच्या ओठांवर किस केले ज्यामुळे निकिताला खूप अस्वस्थ वाटले.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चाहती आधी निकीताच्या गालावर किस घेते. त्यानंतर, ती अचानक तिच्या ओठांवर जबरदस्तीने किस घेऊ लागते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे निकिताला धक्का बसतो आणि ती घाबरते. या प्रकारानंतर निकीता त्या महिला चाहतीला मागे ढकलते आणि तिला बाजूला करते. बराच वेळ ती तोंडाला हात लावून पाहत राहते. तिला नेमकं काय घडलं हेच कळत नाही.
अभिनेत्री निकीताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी हसत आहेत तर काहींनी हा स्टंट असल्याचे सांगितले. नेटकऱ्यांनी त्या महिला चाहतीच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, अभिनेत्री निकीता रावल ही प्रसिद्ध अभिनेत्री, डान्सर आणि हॉटेल व्यावसायिक आहे. तिने २००७ मध्ये 'मिस्टर हॉट मिस्टर कूल' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
निकिता राऊतने त्यानंतर अनिल कपूर आणि शेफाली शाह यांच्यासोबत 'ब्लॅक अँड व्हाईट' या चित्रपटात काम केले. निकिताने 'द हीरो', 'अभिमन्यू' यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. महत्वाचे म्हणजे, फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटात तिने भूमिका साकारल्या आहेत. निकिता रावल अभिनेत्रीसोबत कथक नृत्यांगना देखील आहे. ती अलीकडेच शिल्पा शेट्टी होस्ट करत असलेल्या 'माँ है ना' या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या आईसोबत कुकिंग चॅलेंजमध्ये भाग घेतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.