Homemade face cleanser: मेकअप सोडा...चेहऱ्यावर येईल एकदम नॅचरल ग्लो; साबण्याच्या ऐवजी 'या' घरगुती क्लिंसरने धुवा चेहरा

Surabhi Jayashree Jagdish

खराब त्वचा

उष्णता, कडक ऊन, धूळ आणि घाम यामुळे त्वचेचं नैसर्गिक तेज कमी होऊ शकतो. या काळात चेहऱ्यावर घाम आणि धूळ साचल्यामुळे त्वचा चिकट किंवा निस्तेज दिसू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची स्वच्छता आणि योग्य काळजी घेणं आवश्यक ठरतं.

Besan face cleanser | saam tv

साबणाऐवजी बेसन वापरा

चेहरा निस्तेज दिसू नये आणि त्वचेचा तजेला टिकून राहावा यासाठी साबणाऐवजी बेसनाचा वापर करता येतो. बेसनाचा घरगुती क्लींजर चेहऱ्यावरील धूळ, घाम आणि अतिरिक्त तेल साफ करण्यासाठी वापरला जातो.

Besan face pack | saam tv

बेसनाचा क्लींजर

हे तयार करण्यााठी एक चमचा बेसन किंवा मसूर डाळीची पावडर घ्या. त्यात दोन ते तीन चमचे कच्चं दूध आणि अर्धा छोटा चमचा मध मिसळा. हवं असल्यास यामध्ये चिमूटभर हळद घालू शकता, मात्र हळद वापरणं ऐच्छिक आहे.

Homemade face cleanser | saam tv

पेस्ट तयार करा

एका छोट्या वाटीत बेसन, कच्चं दूध आणि मध घालून ते चांगले एकत्र करा. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून त्याची पेस्ट तयार करा. पेस्ट खूप घट्ट वाटत असल्यास त्यात थोडं दूध घालून योग्य पोत आणू शकता.

Besan for dull skin | saam tv

मलई वापरा

तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर कच्च्या दुधाऐवजी मलईचा वापर करू शकता. मलईमुळे तयार होणारी पेस्ट अधिक मऊ आणि क्रीमी होते. त्यामुळे कोरड्या त्वचेवर ही पेस्ट लावणं अधिक सोपं जातं.

Besan milk honey face pack | saam tv

चेहऱ्यावर पेस्ट लावा

सुरुवातीला चेहरा साध्या किंवा किंचित कोमट पाण्याने ओला करून घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट बोटांच्या मदतीने संपूर्ण चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने लावा. पेस्ट लावल्यानंतर काही वेळ ती चेहऱ्यावर राहू द्या आणि थोडी सुकू द्या.

Gram flour for skin | saam tv

मसाज करून चेहरा स्वच्छ धुवा

पेस्ट थोडी सुकल्यानंतर बोटांनी चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा व्यवस्थित धुऊन घ्या आणि टॉवेलने त्वचा अलगद पुसा. या घरगुती क्लींजरमुळे चेहरा स्वच्छ, मऊ आणि फ्रेश दिसू शकतो.

Homemade face pack | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dull skin remedies | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestion | saam tv
येथे क्लिक करा