Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

Famous Actress Becomes Businesswomen : प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
Famous Actress Becomes Businesswomen
Famous Actresssaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्री झाली बिझनेसवुमन

अभिनेत्रीने नवीन हॉटेल व्यवसाय सुरू केला

मराठी अभिनेत्रीची उंच भरारी

मनोरंजन विश्वातील आणखी एक अभिनेत्री बिझनेसवुमन झाली आहे. मराठी अभिनेत्रीने हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री माधवी निमकरने उंच भरारी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने आपल्या नवीन सुरुवातीची माहिती चाहत्यांना दिली आहे..

माधवी निमकरने एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. माधवी निमकरच्या नव्याकोऱ्या हॉटेलचे नाव 'कल्याणमस्तु' असे आहे. या हॉटेलचे ग्रँड ओपनिंग १५ जुलै २०२६ ला संध्याकाळी पार पडणार आहे. 'कल्याणमस्तु' चे लोकेशन मुंबईजवळ कल्याण येथे आहे. "कल्याणमस्तु, स्वाद आणि आशीर्वाद…" अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या या नवीन व्यवसायाला प्रेक्षक आणा चाहते भरभरून प्रेम करताना दिसत आहे.

माधवी निमकरने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तसेच तिचे कौतुक देखील करत आहेत. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. यात श्रेया बुगडे, समीर खांडेकर, मृणाल दुसानीस, ऋतुजा बागवे, अनघा अतुल यांचा समावेश आहे.

माधवी निमकर टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. आजवर तिने अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. 'हम तो तेरे आशिक है', 'स्वप्नांच्या पलीकडे', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकांचा समावेश आहे. सध्या माधवी निमकर 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'तुझ्या सोबतीने’ या मालिकेत झळकत आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Famous Actress Becomes Businesswomen
Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com