Manasvi Choudhary
हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेकजण हेल्दी 'चिया सीड्स लिंबू पाणी' हे ड्रिंक ऑर्डर करतात. हे ड्रिंक केवळ रिफ्रेशिंगच नाही, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
'चिया सीड्स लिंबू पाणी' हे ड्रिंक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते त्यामुळे तुमचे वजन देखील कमी होते.
ड्रिंक बनवण्यासाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये चिया सीड्स पाण्यात भिजत घाला. हे मिश्रण १५-२० मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
नंतर एका ग्लासमध्ये लिंबाचा रस, मध आणि काळे मीठ टाकून चांगले मिक्स करा. मध व्यवस्थित मिक्स होऊद्या.
या तयार मिश्रणात भिजवलेले चिया सीड्स मिक्स करा. त्यानंतर त्यात थंड पाणी किंवा सोडा ओता.
शेवटी या मिश्रणात बर्फ आणि पुदिन्याची पाने टाका.
हॉटेलस्टाईल ड्रिंक दिसण्यासाठी तुम्ही ग्लासच्या वरती लिंबाची बारीक काप करून ठेवा. ड्रिंक पिण्यापूर्वी सर्व मिश्रण एकदा चमच्याने मिक्स करा.