सध्या सोशल मीडियावर संजू राठोडच्या 'शेकी' गाण्याने ( Sanju Rathod Shaky Song ) धुमाकूळ घातला आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण 'शेकी' गाण्यावर बेभान होऊन नाचताना दिसत आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अलिकडेच 'शेकी' गाण्यावर बॉलिवूडची अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur ) ठेका धरला आहे. तिच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मृणाल ठाकूर 'शेकी' गाण्याच्या हुक स्टेपवर नाचताना दिसत आहे. 'एक नंबर, तुझी कंबर चाल शेकी शेकी है' या गाण्यातील कडक्यावर मृणाल ठाकूर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. मृणाल ठाकूर चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्कॉटलंडला गेली होती. तेव्हा तेथील रस्त्यावर तिने हा कमाल डान्स केला आहे.
कोरिओग्राफर लिप्सा आचार्य हिच्या सोबत मृणाल ठाकूरने 'शेकी' गाण्यावर जबरदस्त डान्स केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मृणाल ठाकूरच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हा डान्स व्हिडीओ कोरिओग्राफर लिप्सा आचार्य हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर संजू राठोड याने देखील कमेंट केली आहे. त्याने लिहिलं की, "किती सुंदर..." तसेच या व्हिडीओवर कलाकारांकडून देखील कमेंट येत आहेत.
मृणाल ठाकूरने बॉलिवूडसोबत साऊथ इंडस्ट्री देखील गाजवली आहे. तिने आजवर मराठी , हिंदी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 14.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.