Sanju Rathod : 'गुलाबी साडी'नंतर आता 'शेकी'ची धूम, संजू राठोडचा बिग बॉस फेम अभिनेत्रीसोबत रोमँटिक अंदाज

Shaky Song Released : संजू राठोडचे नवीन गाणे 'शेकी' नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Shaky Song Released
Sanju RathodSAAM TV
Published On

आपल्या सुपरहिट 'गुलाबी साडी'ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्यानंतर गायक संजू राठोड (Sanju Rathod ) आपल्या नव्या गाण्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचे नवीन गाणे 'शेकी' रिलीज झाले आहे. हे नवीन गाणं फक्त एक ट्रॅक नसून भन्नाट वाइब आहे. 'शेकी' हे गाणं संजू राठोडने स्वतः गायले आहे. तसेच लिहिलेय आणि संगीतबद्ध केले आहे.

मराठी संगीताला मध्यवर्ती ठेवत आणि मराठी पॉप संस्कृतीची पुनः व्याख्या करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाचा हा आणखी एक पुरावा आहे. हे गाणं मराठी लोकसंगीताच्या मातीतल्या गंधाला अफ्रिकन बीट्सच्या जोशात मिसळते. एक असा फ्युजन जो ताजेपण देतो आणि लगेचच मनात घर करतो. उत्साहात भर टाकतो. या गाण्यात बिग बॉस फेम ईशा मालवीय ( Bigg Boss Isha Malviya) देखील दिसत आहे. ईशाने पहिल्यांदाच संजूसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

'शेकी' गाण्यातील संजू राठोड आणि ईशाची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली आहे. 'शेकी' गाण्याच्या प्रवासाबद्दल सांगताना संजू म्हणाला की, "'शेकी' तयार करणं म्हणजे पारंपरिक आणि ग्लोबल यांच्यात एक बारीक दोरावर चालण्यासारखं होते. मी देसी आत्मा जपताना नव्या साउंड्सचा प्रयोग करायचा प्रयत्न केला. ईशासोबत पहिल्यांदा काम करणे एक जबरदस्त अनुभव होता. ती स्क्रीनवर खूपच ऊर्जा आणि ग्रेस घेऊन आली. त्यामुळे गाण्याचा मूडच बदलून गेला. 'शेकी' हे मराठी पॉप संस्कृतीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याच्या माझ्या प्रवासातील पहिले पाऊल आहे."

'गुलाबी साडी' आणि 'काली बिंदी'च्या सततच्या प्रेमानंतर संजू राठोड आता मराठी पॉप संस्कृतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे. 'शेकी' गाण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चाहते संजू राठोडची आगामी प्रोजेक्टची कायम आतुरतेने वाट पाहत असतात.

Shaky Song Released
Dipika Kakar : अभिनेत्री पतीबरोबर काश्मीरला फिरायला गेली, दहशतवादी हल्ल्यानंतर म्हणाली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com