गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीची चर्चा पाहायला मिळत आहे. या चर्चा होण्याचं कारण म्हणजे रुपालीची सावत्र मुलगी - ईशा वर्मा. ईशाने इन्स्टाग्रामद्वारे सावत्र आई रुपाली गांगुली आणि वडील अश्विन वर्मा यांच्यावर अनेक आरोप केले होते. सोमवार ११ नोव्हेंबर रोजी ईशाने या संदर्भामध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्येही तिने आपल्या सावत्र आईने आणि आपल्या वडिलांनी आपला कसा छळ केला या संदर्भात माहिती दिली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या काही तासांमध्येच रुपाली गांगुलीने ईशाला ५० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली. ही नोटीस मिळाल्यानंतर तिने व्हायरल व्हिडीओ डिलीट केला.
ईशाने पोस्ट केलेल्या व्हिडीओला रुपाली गांगुलीने कायदेशीर प्रत्युत्तर दिले. मंगळवारी सकाळी ईशाने वादग्रस्त व्हिडीओ डिलीट केला असे म्हटले जात आहे. शिवाय तिने इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट (Instagram Private) केल्याचेही पाहायला मिळते.
"मला त्रास देणाऱ्यांच्या विरोधात मी उभी राहणार आहे. या लोकांनी फक्त मलाच नाही तर माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती - माझी आई, तिचाही खूप छळ केला. त्यांनी मला मानसिक त्रास दिला. मला एकटं पाडणं, सतत टीका करणं, मला ज्या गोष्टी त्रास देतात त्यावर मी कुठेतरी कमी पडतेय. असा विचार करायला त्यांनी मला भाग पाडलं. या कृत्याची त्यांनी कधीच माफीही मागितली नाही. माझ्या जन्मदात्या वडिलांनी माझ्या मानसिक स्थितीची चेष्ठा केली. त्यांच्या या वागणुकीचा मला सर्वात जास्त त्रास झाला." असे ईशाने व्हिडीओमध्ये म्हटले होते.
"मी जेव्हा त्यांनी मीडियासमोर पाहते, तेव्हा माझ्या या कधीही न भरल्या जाणाऱ्या जखमा पुन्हा ओल्या होतात. मी या गोष्टी टाळायचा प्रयत्न करते. पण काही वेळेस ते मला शक्य होत नाही. हा मानसिक त्रास मला सारखा सारखा सहन करावा लागत आहे. त्यांचं खोटं वागणं आणि आपण काहीच केलं नाहीये हा अविर्भाव पाहून मला खूप दु:ख होतं." असेही म्हणत ईशा वर्माने आपली व्यथा व्हिडीओमार्फत मांडली होती.
रुपाली गांगुली आणि त्यांच्या वकिलांनी या सर्व आरोपांचे खंडन करत 'ईशाने हे बिनबुडाचे आरोप रुपाली गांगुलीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी आणि तिची सामाजिक प्रतिष्ठा कमी करण्यासाठी केले आहेत.' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.