Dipika Kakar : अभिनेत्री पतीबरोबर काश्मीरला फिरायला गेली, दहशतवादी हल्ल्यानंतर म्हणाली...

Pahalgam Terror Attack : टिव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर काश्मीरला फिरायला गेली होती. तिने आता आपण सुखरूप असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
Pahalgam Terror Attack
Dipika KakarSAAM TV
Published On

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack ) येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. काश्मीर खोऱ्यातील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. यावर सर्व बाजूंनी संताप व्यक्त केला जात आहे. सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशात आता एक माहिती समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) ही देखील सहकुटुंब काश्मीरला फिरायला गेली होती.

अभिनेत्री दीपिका कक्कर तिचा नवरा अभिनेता शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) आणि लहान मुलासोबत नुकतेच काश्मीरला फिरायला गेले होते. त्यामुळे हल्ल्याची बातमी ऐकताच दीपिका-शोएबचे चाहत्यांना चिंता लागली होती. मात्र आता दीपिका आणि तिचे संपूर्ण कुटुंब सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. दीपिकाचा नवरा शोएब इब्राहिमने इन्स्टाग्राम एक स्टोरी शेअर करून आपण सुखरूप असल्याची माहिती दिली आहे.

शोएब-दीपिकाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं की, "नमस्कार मित्रांनो...तुम्हाला सर्वांना आमची चिंता लागून होती. हम सब सुरक्षित हैं... ठीक हैं... आज मॉर्निंगला आम्ही काश्मीर सोडलं आणि सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचलो आहे. तुमच्या काळजीसाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद..."

Shoaib Ibrahim
Shoaib Ibrahiminstagram

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम काही दिवसांपासून काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. त्यांच्या फिरण्याचे फोटो आणि व्हिडीओ ते सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत होते. दीपिका कक्कर अलिकडेच सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये पाहायला मिळाली. तिच्या पदार्थांनी तिने परीक्षकांना वेड लावले. मात्र काही वैद्यकीय कारणांमुळे तिने मध्येच शो सोडला. चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Pahalgam Terror Attack
Posco 307 Movie Teaser : "आता गुन्ह्याला भिक्षा नाही, शिक्षा मिळणार...", 'पॉस्को ३०७' चित्रपटाचा धमाकेदार टीझर पाहिलात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com