गुन्हेगारी, अन्याय, मारामारी यांसारख्या घटना समाजात घडताना दिसतात. मात्र या सगळ्याला आळा केव्हा बसणार हा प्रश्न साऱ्यांना सतावतोय? घरातून बाहेर निघताना आपण पुन्हा घरी परतू की नाही याच विचारत आपण असतो. समाजातील हा अन्याय, ही भीती आता आणखी गडद होत चालली आहे. गुन्हा करणारा बरेचदा माफीच्या जोरावर वा दूर पळून जातो. त्याला मिळणारी शिक्षा ही बरेचदा ऐकूही येत नाही. आता गुन्ह्याला भिक्षा नाही तर शिक्षा मिळणार आहे कारण लवकरच 'पॉस्को ३०७' (Posco 307) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गुन्ह्याला योग्य ती शिक्षा मिळवून देणारा, अन्यायाला न्याय मिळवून देणाऱ्या या नव्या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपटच समाजातील गुन्ह्यांच्या घटनांबाबत प्रेक्षकांचे डोळे उघडणार आहे. 'पॉस्को ३०७' हा चित्रपट 16 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पॉस्को' हा कायदा नेमका काय आहे, कशावर आधारित आहे हे मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. 2012 साली आलेला हा कायदा तितकासा जनतेला ज्ञात नाही. चिमुकल्यांवर होणारे लैंगिक अत्याचार, अनेक महिलांवर होणारे अत्याचार ज्यांचा आजवर निकाल लागलेला नाही. यात अनेक मोठ्या लोकांचा संदर्भ असतो. निरागसतेला न्याय मिळवून देण्यासाठी या कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.
महाभारतातील अनेक घटनांचा आधार घेत या चित्रपटाची बांधणी केली आहे. स्वरूप सावंत दिग्दर्शित हा चित्रपट असून त्याने या चित्रपटाच्या कथेची आणि पटकथेची जबाबदारी ही उत्तमरीत्या पेलवली आहे. तर सोपान पुरंदरे यांनी हा चित्रपट त्यांच्या कॅमेरात कैद केलाय. या चित्रपटाला प्रथमेश कानडे याने संगीत दिलं असून संकलक म्हणूनही स्वरूप सावंत याने बाजू सांभाळली आहे. जबरदस्त डायलॉग आणि ॲक्शन चित्रपटात पाहायला मिळमार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.