Crime News: शिवसेना शहर प्रमुखाच्या बॉडीगार्डचा वाद, एकाने दुसऱ्याची बंदूक चोरली; बदलापूरात उडाली खळबळ

Badlapur Crime: बदलापूरच्या शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे बॉडीगार्ड जजलाल पांडे आणि कृष्णाप्रसाद तिवारी यांच्यातील वादामुळे तिवारीची बंदूक आणि मोबाईल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली, ज्यात पांडेने चोरी कबूल केली आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
Badlapur News
शिवसेना शहर प्रमुखाच्या बॉडीगार्डचा वाद, एकाने दुसऱ्याची बंदूक चोरली; बदलापूरात उडाली खळबळGoogle
Published On

बदलापूरच्या शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासोबत खासगी बॉडीगार्ड म्हणून काम करणारे जजलाल बुलंद पांडे आणि कृष्णाप्रसाद तिवारी यांच्यातील वाद एका गुन्ह्याला कारणीभूत ठरला. एका बॉडीगार्डने दुसऱ्या बॉडीगार्डची बंदूक चोरल्याची घटना घडली आहे. हे दोघेही शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे बॉडीगार्ड आहेत. आपसातील वादामुळे हा प्रकार केल्याची कबुली आरोपी बॉडीगार्डने दिली आहे.

14 मार्च रोजी, होळीच्या दिवशी, कृष्णाप्रसाद तिवारी ड्युटी संपवून वामन म्हात्रेंच्या एरंजाड येथील फार्महाऊसवर विश्रांती घेत होता. त्याने स्वतःची 8 काडतुसं असलेली बंदूक उशीखाली ठेवली होती. काही वेळाने तो अंघोळीला गेला, मात्र परत आल्यानंतर त्याला त्याची बंदूक आणि मोबाईल गहाळ असल्याचे लक्षात आले.

Badlapur News
Badlapur Crime : ५० लाख दे नाहीतर...; बदलापूरच्या माजी नगरसेवकाला धमकी

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, पोलिसांना जजलाल पांडे याच्यावर संशय गेला. चौकशीअंती त्याने कृष्णाप्रसाद तिवारीला अडचणीत आणण्यासाठी त्याची बंदूक आणि मोबाईल लपवल्याची कबुली दिली.

पोलिसांनी जजलाल पांडेकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला. कृष्णाप्रसाद तिवारीची बंदूक आणि 4 जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. बॉडीगार्ड तिवारीचा मोबाईल. आरोपी जजलाल पांडेची रिव्हॉल्व्हर. 18 जिवंत काडतुसे आणि 7 रिकाम्या पुंगळ्या, आणि आरोपी पांडेचा मोबाईल अशा सर्व गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी जजलाल पांडे याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Purva Palande

Badlapur News
Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; ६ वर्षीय चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे अश्लील चाळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com