Badlapur Crime : ५० लाख दे नाहीतर...; बदलापूरच्या माजी नगरसेवकाला धमकी

Badlapur Former Corporator Threatens Obscene Photos Viral : बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिन्याभरापूर्वी एका अज्ञात नंबरवरुन व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला होता.
Badlapur former corporator Shailesh Vadnere threat
Badlapur former corporator Shailesh Vadnere threatSaam Tv News
Published On

ठाणे : बदलापूरमध्ये एका माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली आहे.

बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिन्याभरापूर्वी एका अज्ञात नंबरवरुन व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्लील फोटो होते. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्याने त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीला हा खोडसाळपणा वाटल्याने वडनेरे यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र, खंडणीखोरांचा तगादा वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली.

Badlapur former corporator Shailesh Vadnere threat
Satish Bhosale : खोक्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी, तुरुंगात डांबण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात काय सांगितलं?

या तक्रारीची गंभीर दखल घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास करत बदलापूरमधूनच चार जणांना बेड्या ठोकल्या. अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडारकर, दीपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी या चौघांची नावे आहेत. या सर्वांना १२ मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या चौघांपैकी अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दीपक वाघमारे या दोघांवर यापूर्वी अंबरनाथमध्ये एका नामांकित डॉक्टरच्या घरावर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातून जामीनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्यांनी माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना खंडणीसाठी धमकी दिली. मात्र, बदलापूर पूर्व पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडत त्यांना पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या.

Badlapur former corporator Shailesh Vadnere threat
Nashik Crime : भाजप पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पिस्तुलाचा धाक दाखवत केला अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com