Manasi Naik And Pardeep Kharera Divorced Instagram
मनोरंजन बातम्या

Mansi Naik Divorced: मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा झाले विभक्त; घटस्फोट होताच अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

Manasi Naik And Pardeep Kharera News: मानसीने २०२१ मध्ये प्रदिप खरेरा सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या वर्षभरातच मानसीने पतीपासून विभक्त होत असल्याचा निर्णय घेतला होता. आता अधिकृतपणे तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

Chetan Bodke

Manasi Naik And Pardeep Kharera Divorced

अभिनेत्री मानसी नाईक मराठी प्रेक्षकांसमोर 'बाई वाड्यावर या' आणि 'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यातून समोर आली होती. सोबतच मानसी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मानसीने २०२१ मध्ये प्रदिप खरेरा सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या वर्षभरातच मानसीने पतीपासून विभक्त होत असल्याचा निर्णय घेतला होता. आता अधिकृतपणे तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण (Manasi Naik Divorce) झालेली आहे. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने स्वत: तिच्या युट्यूब अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (Marathi Actress)

अभिनेत्री आपल्या व्हिडीओमध्ये म्हणते, “मी माझा वाढदिवस परदेशातून सेलिब्रेट करून भारतात आली आहे. माझ्या आयुष्यात आलेले अडथळे कायमचे दुर करण्यासाठी गेल्या एक ते दीड वर्षांपासून माझा जो अट्टाहास सुरू होता, तो मी दूर केला आहे. मी आता माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात नव्या ढंगात आणि नव्या रूपात सुरु करत आहे. कोणत्याही सेलिब्रिटीचे आयुष्य कधीही खासगी नसते, ते पब्लिक असतं. माझ्या कठीण काळामध्ये माझ्या चाहत्यांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे, त्यांनी मला खूप धीर दिला. माझा चाहतावर्ग खूप भावनिक आहे. याचा मी जवळून अनुभव घेतला आहे. माझ्या नव्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे.” (Social Media)

मानसी नाईक आपल्या व्हिडीओमध्ये पुढे म्हणते, “गेले काही वर्ष माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंजिंग होतं. मी अनेकदा माझ्या मनातल्या भावना माझ्या चाहत्यांसमोर अनेक मुलाखतीतून ठेवल्या होत्या. स्त्री म्हणून या जगामध्ये राहायचं असेल ताठ मानेने जगायचे असेल तर काही गोष्टी स्पष्टपणे बोलायला हव्यात असं मला वाटतं. जर तुम्ही माझ्या इंटरव्ह्यू किंवा सोशल मीडियावर लाईव्ह पाहिलं असेल तर, मी कधीही खोटं, आपली मान खाली घालून राहावं लागेल किंवा लाज वाटेल असं मी कधीच वागत नाही. अखेर माझा घटस्फोट झाला आहे. तुम्हाला हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. आता मी अधिकृतरित्या मानसी नाईक आहे.” (Marathi Film)

“माझ्या चाहत्यांना, फॅमिली मेंबर्सला, मित्र मंडळींना आणि ट्रोलर्सना सांगते की, मी हरले नाही तर जिद्दीने समाजात वावरायला आता सज्ज आहे. कलाकार म्हणून आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण सामान्यांपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे गोष्टी लपवला येत नाही. आम्ही सुद्धा माणसं आहोत, आमच्याकडूनही चुका होतातच. आता आनंदाने नवा प्रवास सुरू करायला मी सज्ज झाली आहे. माझं आयुष्य काही खासगी राहिलं नव्हतं. माझ्या आयुष्यातली सर्व माहिती चाहत्यांना माहित होती. म्हणून मी हा खास व्हिडीओ चाहत्यांसाठी केला आहे.” असं आपल्या युट्यूबच्या व्हिडीओमध्ये मानसी नाईक म्हणाली आहे. (Divorced)

मानसी नाईक आणि प्रदीप खरेराचं लग्न १९ जानेवारी २०२१ रोजी झाले होते. त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मानसीच्या 'बाई वाड्यावर या' आणि 'वाट बघतोय रिक्षावाला' सह अनेक गाण्यांमुळे तिला महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली आहे. मानसी आपल्या नृत्यशैलीने, अभिनयाने आणि सौंदर्यामुळे नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Rada: कबुतरखान्याचा प्रश्न चिघळला, दादरमध्ये तुफान राडा; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, पाहा VIDEO

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट; सायलीच तन्वी असल्याचं सत्य मधुभाऊंना समजलं? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: माधुरी हत्तीणीबाबत वनताऱ्याच्या अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची चर्चा

Whatsapp: भारतामधील तब्बल ९८ लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स बंद, तुमचे खाते तर नाही ना? जाणून घ्या कारण

Zp School : मराठी सोबतच विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचेही धडे; मावळच्या जिल्हा परिषदे शाळेचा अभिनव उपक्रम

SCROLL FOR NEXT