
सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये पूजा सावंतच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. तिने रिलेशनची घोषणा केल्यापासून तिच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा साखरपुडा झाला. अभिनेत्रीचा साखरपुडा झाल्यानंतर आता लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झाली आहे. २६ फेब्रुवारीला म्हणजेच काल अभिनेत्रीचा हळदी समारंभ पार पडला आहे. यावेळी कपलच्या लूकची आणि तिच्या कलवऱ्यांच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.
साखरपुडा, संगीत आणि मेहंदी सोहळ्यानंतर आता पूजाला सिद्धेशच्या नावाची हळद लागली आहे. पूजाच्या हळदी समारंभातले अनेक फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये स्टायलिश अंदाजातला हळदीचा मंडप, फुलांची सजावट, पारंपारिकतेला आधुनिकतेचा साज, नवरीच्या करवल्यांचा थाट, पूजाच्या आई- वडीलांची हळदीतली लगबग, त्यासोबतच बेस्ट फ्रेंड्सचा स्टायलिश लूक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. सध्या सर्वांच्याच लूकची जोरदार चर्चा होत आहे.
हळदीमध्ये पूजाने आणि सिद्धेशने सेम टू सेम लूक केलेला होता. पूजाने हळदी समारंभासाठी जांभळ्या रंगाचा साधा सिंपल लेहेंगा परिधान केला होता. सिंपल लेहेंगा, आकर्षक हेअरस्टाइल, हातात हिरवा चुडा आणि 'सिद्धेशची नवरी' असं लिहिलेली कलाई असा खास लूक पूजाने हळदी समारंभासाठी केला होता. तर सिद्धेशने लखनवी स्टाईलमध्ये कुर्ता आणि व्हाईट पॅंट वेअर केली होती. हळदीमध्ये पूजाने आणि सिद्धेशने “बुमरो…” या लोकप्रिय गाण्यावर डान्स सुद्धा केला आहे.
पूजा आणि सिद्धेशच्या हळदीमध्ये प्रार्थना बेहेरे, प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर, सुखदा खांडकेकर, अभिषेक खांडकेकर, भूषण प्रधान, वैभव तत्ववादी यांच्यासह पूजाच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हळदी समारंभाला खास उपस्थिती लावली आहे. पूजा व सिद्धेश आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
२८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. सिद्धेश चव्हाण असं त्याचं नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनन्ससंबंधित काम करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.