
प्रियामणी राज आणि यामी गौतम स्टारर ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. २३ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या ह्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. कोट्यवधी रुपयांमध्ये निर्मित झालेल्या चित्रपटाने पहिल्या विकेंडला दमदार कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाने पहिल्या चार दिवसांमध्ये ३८ कोटींच्या आसपास कमाई केलेली आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईबद्दल... (Bollywood)
आदित्य जांभाळे दिग्दर्शित चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी ३.२५ कोटींची कमाई केली आहे. ही कमाई इतर दिवसांच्या कमाईपेक्षा फार कमी आहे. पण असं असलं तरीही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरू आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.१२ कोटी, दुसऱ्या दिवशी ९.०८ कोटी, तिसऱ्या दिवशी १०.२५ कोटींची तर चौथ्या दिवशी ३.२५ कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवसाच्या कमाईमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कमाईच्या बाबतीत यामी गौतमच्या या चित्रपटाने विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’ला मागे टाकलं आहे. (Bollywood Film)
२०१९ मध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू- काश्मीरमधून 'कलम ३७०' हटवला होता. त्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. काश्मीरवरील परिस्थितीवर भाष्य करणारा हा दुसरा चित्रपट आहे. 'द काश्मीर फाईल्स' नंतर 'आर्टिकल ३७०' बद्दल प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 'आर्टिकल 370' हा चित्रपट घटनेतील कलम 370 हटवणे आणि काश्मीरमधील दहशतवाद या विषयावर आधारित आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी कोट्यवधींचा खर्च केलेला आहे. अरुण गोविल, यामी गौतम, प्रियामणी, किरण करमरकर यांच्यासह अनेक कलाकारांनी 'आर्टिकल 370' या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.