hunar hali News : 'छल: एक शह आणि मात' आणि 'थपकी प्यार' सारख्या अनेक मालिकांमध्ये अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात छाप पाडणारी अभिनेत्री हुनर हाली त्रस्त झाली आहे. पापाराझीने शुट केलेल्या व्हिडिओमुळे हुनर हाली त्रस्त झाली आहे. तिच्या प्रायव्हेट क्षणांचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी एका ब्यूटी सलूनमधील एका इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या हुनरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे अभिनेत्रीचा संताप अनावर झाला आहे.
एका हिंदी वृत्त वाहिनीच्या रिपोर्टनुसार, पापाराझीने परवानगी न घेता व्हिडिओ शूट केल्याचा दावा अभिनेत्रीचा आहे. काही लोकांनी हा अभिनेत्रीचा प्रसिद्धीसाठी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. मागील १५ वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अभिनेत्रीने आरोप फेटाळले आहेत. एका हिंदी वृत्त संस्थेशी बोलताना हुनर हाली म्हणाली, मी या प्रकाराचा तीव्र निषेध करतो. मी पापाराझींना प्रायव्हेट क्षणांचा व्हिडिओ शूट करण्याचा अधिकार दिलेला नाही. मी त्यांना प्रश्न विचारू इच्छित आहे की, माझा व्हिडिओ शूट करून अपलोड करण्याचा अधिकार कोणी दिला?'.
हुनर हाली पुढे म्हणाली, 'मुंबई माझं शहर आहे. मी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. मुंबई मेट्रोपोलिटन शहर आहे. कोणतंही छोटं मोठं शहर नाही. मी हॉल्टेर टॉप आणि एका ट्राऊजरवर होती. माझ्या एका व्हिडिओला अनकम्फर्टेबल क्लोथिंग, असं कॅप्शन दिलं आहे. मी रस्त्याने चालताना कपडे व्यवस्थित करत होते. तेव्हाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा अधिकार कोणी दिला? माझा लपून छपून व्हिडिओ शूट केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची काय गरज होती? एवढा तरी कॉमन सेन्स हवा'.
हुनर पुढे म्हणाली, 'मी आज या गोष्टीवर बोलायचं ठरवलं आहे. मी अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत काम करत आहे. मला सर्व जण ओळखतात. मला अनेक जण पब्लिसिटी स्टंट असल्याचं बोलत आहेत. मला आश्चर्य वाटत आहे. मी स्वत: मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या पेजेसला व्हिडिओ हटवण्यास सांगितलं आहे. यात काही लोक अजिबात ऐकायला तयार नाही. कारण त्यांना चांगले व्हूज मिळाले आहेत. त्यामुळे प्रश्न मला नाही, त्यांना विचारले पाहिजे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.