Hruta Durgule Interview Instagram
मनोरंजन बातम्या

Hruta Durgule Interview : ‘कोणताही प्रोजेक्ट असो, पहिलाच प्रोजेक्ट म्हणून...’ हृता दुर्गुळेने सांगितला पहिल्या बॉलिवूड प्रोजेक्टच्या कामाचा अनुभव

Hruta Durgule News : दिलेल्या मुलाखतीमध्ये हृताने तिला ‘कमांडर करण सेक्सेना’ सीरीजमध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली ? या विषयी सांगितले आहे.

Chetan Bodke

‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून अभिनेत्री हृता दुर्गुळेची तिच्या फॅन्समध्ये विशेष ओळख आहे. ‘फुलपाखरू’ सीरीयलमधून हृताला प्रसिद्धी मिळाली होती. तर, तिने ‘अनन्या’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर डेब्यू केले आहे. आता हृताने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ओटीटीमधून डेब्यू केले आहे. नुकतीच अभिनेत्रीने ‘कमांडर करण सेक्सेना’ या सीरीजमधून हिंदी वेबविश्वामध्ये डेब्यू केले आहे. या सीरीजमध्ये हृताने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकरली आहे. सध्या हृता सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे.

‘सकाळ’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हृताने तिला ह्या सीरीजमध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली ? या विषयी तिने सांगितले आहे. ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, हृताने सांगितले की, "मला सीरीजच्या प्रॉडक्शन हाऊसमधून कॉल आला होता. शिवाय माझं कास्टिंग डायरेक्टरसोबतही बोलणं झालं. त्यावेळी त्यांनी मला, तू बॉलिवूडमध्ये वेबसीरीजमध्ये काम करशील का ? असं विचारलं होतं. त्यानंतर माझी जतीन सारण आणि प्रॉडक्शन हाऊसच्या टीमसोबत मीटिंग झाली. त्यांनी मला मीटिंगनंतर काहीही रिप्लाय दिला नव्हता. अचानक १० ते १५ दिवसांनंतर मला प्रॉडक्शन हाऊसकडून कॉल आला, तेव्हा माझी निवड करण्यात आल्याचे कळले."

मुलाखतीमध्ये हृताने पुढे सांगितले की, "मी इतक्या मोठ्या प्रोजेक्टची भाग झाल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी नेहमीच कोणताही प्रोजेक्ट असो, तो माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे, असं मनात ठेवूनच काम करते. खरंतर, प्रत्येकासाठी आपलं पहिलं काम हे फार विशेष असतं. आपण जेव्हा कोरी पाटी घेऊन पुढे जातो, त्यावेळी ते सगळ्याच दृष्टीने फार खास असतं. याऊलट जर आपण आपल्या पूर्वीच्या कामाचा अंदाज घेऊन पुढे गेलो की, मी असं असं काम केलं आहे आणि हे हे यश मी मिळवलं आहे, असं आपण म्हणतो. तर, पुढची कामं करताना कदाचित त्यामध्ये तोच तोचपणा येऊ शकतो. जे एक अभिनेत्री म्हणून माझ्या विकासासाठी योग्य नाहीये."

मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये, हृताने सांगितले की, "म्हणूनच मी कायम वेगवेगळ्या प्रकारचे काम करते. मला कठीण काम करायला आवडतं. म्हणूनच ज्यावेळी ‘दुर्वा’ मालिकेमध्ये काम करताना माझ्यामध्ये जी उत्सुकता होती, तिच उत्सुकता माझी आताही कायम आहे."

पाकिस्तानचा कट उधळवून टाकण्याच्या तयारीत असलेल्या 'कमांडर करण सक्सेना' यांची गोष्ट या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. 'महाराष्ट्राची क्रश' हृता दुर्गुळेसोबत या सीरिजमध्ये अभिनेता गुरमीत चौधरी आणि इक्बाल खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हृता या वेबसीरीजमध्ये एसीपी रचना म्हात्रे या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतेय. ८ जुलैला ही वेब सीरिज Disney + Hotstar वर प्रदर्शित झाली आहे. या सीरीजला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT