Hina Khan Stunt in Khatron Ke Khiladi Season 13/realhinakhan/instagram SAAM TV
मनोरंजन बातम्या

Khatron Ke Khiladi 13: बापरे! हिनं तर गळ्यात अजगर गुंडाळला; खतरों के खिलाडीमध्ये हिनाचा खतरनाक स्टंट, PHOTO

Hina Khan Stunt in Khatron Ke Khiladi Season 13: हिना खान आता खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Hina Khan Stunt in Khatron Ke Khiladi Season 13: 'ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेतील साधी, सोज्वळ सून अक्षराला प्रेक्षकांनी आपल्याच घरातली सदस्य असल्यासारखी स्वीकारली, आपलीशी केली; तीच हिना खान आता खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्यात तिनं चक्क अजगराला गळ्याभोवती गुंडाळलं आहे.

हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेतून प्रसिद्धीस आली. हिनाने मालिका विश्वात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. हिना खानने 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्येही आपलं नावलौकिक कमावलं आहे. हिना आता पुन्हा 'खतरों के खिलाडी १३ ' मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. (TV Show)

काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'चं शूटींग केप टाउनमध्ये सुरू झालं आहे. या शोमध्ये हिना खान एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता स्वतः हिना खाननेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती केपटाउनला गेल्याची बातमी सर्वांना दिली आहे.

हिनाने रोहित शेट्टीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये तिनं अजगराला गळ्याभोवती गुंडाळल्याचे दिसते. त्यावर तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. या फोटोंवरुन हिना नवीन स्टंट करायला 'रेडी' असल्याचं लक्षात येत आहे.

'खतरों के खिलाडी' या शोमुळे माझं आयुष्यच बदललं आहे. पुन्हा एकदा या शोचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे. या शोमुळं तुमचं मनपरिवर्तन होतं. तेही अगदी सहजगतीनं. तुम्ही कायमच पूर्वीसारखेच चांगले राहू किंवा वागू शकत नाही. नेहमी स्वतःमध्ये काही न काही बदल करावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्टर ऑफ स्टंट्स आणि अॅक्शनचे देव रोहित शेट्टीला भेटायला मिळालं. जो एक गोड आणि अत्यंत नम्र माणूस आहे. या शोमधून खूप काही शिकायचं आहे. जे कायम माझ्या हृदयाच्या जवळ राहील", असं हिनानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हिना खान ही याआधी 'खतरों के खिलाडी ८' मध्ये झळकली होती. त्या वेळी हिनाने आपल्या स्टंटमुळे अंतिम फेरीत बाजी मारली होती. पण हिना आता पुन्हा एकदा स्टंट करायला सज्ज झाली आहे. 'खतरों के खिलाडी १३' हा शो येत्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर हिना शहीर शेखसोबत 'बरसात हो गई' या गाण्यात झळकली होती. याआधी हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर हिनाने 'बिग बॉस'मध्येही एन्ट्री केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडापावला मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

SCROLL FOR NEXT