Kangana Ranaut Emergency Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut : कंगना यांचा इमर्जन्सी चित्रपट पुन्हा वादात, रिलीज डेट पुढे ढकलली, नेमकं कारण काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॅालिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत (Kangna Ranaut) यांच्यासाठी २०२४ या वर्षाची सुरुवात एकदम खास झाली. कंगना राणौत यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. २०२४च्या सुरुवातीलाच कंगना यांने त्यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची घोषणा केली होती. घोषणेनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुक्ता पाहायला मिळतेय.

परंतु, कंगना (Kangna Ranaut) यांच्या चित्रपटाला कोणाची तर नजर लागल्याचं पाहायला मिळतंय. 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटाची प्रदर्शित होण्यची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपट पाहाण्यासाठी चाहत्यांना अणखी किती दिवस वाट पाहायला लागणार असा प्रश्न उपस्थित होतोय.

कंगना राणौत यांनी 'मणिकर्णिका' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं होतं. 'इमर्जन्सी 'चित्रपटाच्या घोषणेनंतर अनेक मुलाखातींमध्ये कंगना यांनी '' इमर्जन्सी हा चित्रपट माझ्या आयुष्यातीस सर्वात खास चित्रपट आहे.'' असे म्हटले. मात्र 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडल्याचं चित्र दिसत आहे.

सरबजीत सिंग खालसा कोण आहे?

सरबजीत सिंग खालसा यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी याच्या हात्याकांडा दरम्याण सरबजीतचा सहभाग पाहायला मिळाला होता. कंगणा राणैात यांनी 'इमर्जन्सी' या चित्रपटामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये कंगणा यांचा दबदबाव पाहायला मिळतोय. 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये अनुपम खेर , श्रेयस तळपदे ,महिमा चौधरी , मिलिंद सोमण,विशाक नायर यारख्या कलाकारांची अ‍क्टिंग पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाहद्दल उत्सुक्ता पाहायला मिळतेय.

चित्रपट पुढे का धकलण्यात आला

कंगना (Kangna Ranaut) यांचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट २४ नोंव्हेबर २०२३ मध्ये रिलीज होणार होता. परंतु, काही कारणांमुळे त्यावेळे तो प्रदर्शित झाला नाही त्यानंतर १४ जून २०२४मध्ये रिलीज होणार असं सांगितलं होतं. मात्र सध्या कंगना मंडी जिल्हयातून भाजपची खासदार असल्यामुळे त्या देश सेवेमध्ये व्यस्त असल्याचे कळत आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT