अभिनेत्री कंगना रणौत तिच्या चित्रपटांमुळे किंवा राजकारणामधील वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कंगनाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला 'इमर्जन्सी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय त्यासोबतच प्रेक्षक सुद्धा ट्रेलरला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता 'मिलिंद सोमण' देखील इमर्जन्सी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.
'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये मिलिंद सोमण 'सॅम माणेकशॉ' यांची भूमिका यांची साकारताना दिसणार आहेत. त्यासोबतच कंगना रणौत हिने 'दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी' यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये कंगनाचा रूबाब पहायला मिळतोय. इमर्जन्सीमध्ये बॉलिवूड अभिनेत्रे 'अनुपम खेर' आणि मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये झळकलेला 'श्रेयस तळपदे' या दोघांची एक झलक पहायला मिळत आहे.
इमर्जन्सीच्या ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी आणि त्यांचे वडिल दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामधील नातं कसं घट्ट होत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच इंदिरा गांधी यांनी त्यांच्या राजकारणातल्या दीर्घ कारकिर्दीत राजकीय अशांतता आणि युद्ध कसे हाताळले आहेत याची झलक आपल्याला ट्रेलरमध्ये पहायला मिळेल.
इमर्जन्सी या चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगना रणौतने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यांनी ४९ वर्षांपूर्वी १९७५ मध्ये लागू केलेल्या इमर्जन्सी बद्दल सांगीतले आहे. त्या काळामधील भारताचे राजकारण आणि इंदिरा गांधी यांनी सर्व प्रसंग कसे हाताळले या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक आपल्याला सांगण्याचे प्रयत्न करत आहे. इमर्जन्सी हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अनेक प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक दिसत आहे. ट्विटरवर देखील चाहत्यांकडून चित्रपटाला विविध रिव्यू देताना दिसत आहेत.
Edited By: Nirmiti Rasal