Ridhima Pathak News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ridhima Pathak News : मॉडेल रिद्धिमा पाठकसह तिच्या भावाविरोधात फसवणुकीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय ?

Ridhima Pathak News : टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पाठक आणि तिच्या भावाविरोधात एका ऑस्ट्रेलियाच्या कंपनीने गुन्हा दाखल केलेला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Chetan Bodke

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रिद्धिमा पाठकसंबंधित एक महत्वाची बातमी समोर येत आहे. टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पाठक आणि तिच्या भावाविरोधात एका ऑस्ट्रेलियाच्या कंपनीने गुन्हा दाखल केलेला आहे. अभिनेत्री आणि तिच्या भावाविरोधात ऑस्ट्रेलियाच्या एस्टिमेट इलेक्ट्रिकल कंपनीने नागपूर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.

रिद्धिमा पाठक आणि तिचा भाऊ इशान पाठक यांची पुण्यामध्ये स्वत:च्या मालकीची कंपनी आहे. तिच्या कंपनीचं नाव रिस्विच असं असून ती एक इंटरनॅशनल कंपनी आहे. अभिनेत्री आणि तिच्या भावावर बनावट बिलं तयार करुन एस्टिमेट इलेक्ट्रिकल कंपनीकडून जास्त रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियन कंपनीने नागपूरच्या सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

केलेल्या तक्रारीनंतर आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु अभिनेत्रीला आणि तिच्या भावाला अटक करण्यात आलेली नाही. नागपूर सायबर पोलिसांकडून अभिनेत्रीवर कलम ४०६, ४२० आणि ४६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रिद्धिमा पाठक एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून ती आयपीएलमध्ये होस्टिंगही करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT