Amisha Patel
Amisha Patel Saam tvT
मनोरंजन बातम्या

अभिनेत्री अमिषा पटेल भलत्याच अडचणीत; कोर्टाकडून वॉरंट; नेमकं काय आहे प्रकरण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री अमिषा पटेल(Amisha Patel) मधल्या काळात सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे खूप चर्चेत होती. परंतु आता तिच्या विरोधात मुरादाबाद येथील एसीजेएम-५ न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. कोर्टाच्या सुनावणीला हजर न राहिल्याने बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट काढण्यात आलं आहे. आता अमिषा पटेलला २० ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी(Case) एसीजेएम-५ च्या कोर्टात हजर राहावे लागणार आहे. चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिच्या सहकाऱ्यावर ११ लाख अ‍ॅडव्हान्स घेऊनही कार्यक्रमात सहभागी न झाल्याचा आरोप आहे.

चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिच्या सहकाऱ्यावर ११ लाख अ‍ॅडव्हान्स घेऊनही कार्यक्रमात उपस्थित न राहिल्याचा आरोप आहे. एका लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तिला नृत्य सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र पैसे घेऊनही अमिषा या कार्यक्रमाला आली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ड्रीम व्हिजन इव्हेंट कंपनीचे मालक पवनकुमार वर्मा यांनी अमिषा पटेल यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे आयपीसी कलम १२०-बी, ४०६,५०४ आणि ५०६ अंतर्गत अमिषा पटेलविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात सुनावणी सुरू आहे. परंतु पहिल्या सुनावणीला अमिषा कोर्टात उपस्थित नव्हती. आता वॉरंट जारी करूनही अमिषा पटेल कोणतेही ठोस कारण न देता न्यायालयात पुढील सुनावणीला हजर राहिली नाही, तर न्यायालय तिच्याविरुद्ध जामीन नामंजूर करू शकते.

माहितीनुसार, अमिषा पटेल विरोधात खटला दाखल करणाऱ्या इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा म्हणाले की, त्यांनी फक्त अमिषाला अ‍ॅडव्हान्स पैसेच दिले नव्हते तर, मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवास त्याचबरोबर दिल्लीत महागड्या हॉटेल्समध्ये तिच्या राहण्याची सोयदेखील केली होती. मात्र अमिषा पटेलने दिल्लीत येऊनही, मुरादाबाद दिल्लीपासून दूर असल्याचे कारण देत कार्यक्रमाला न आल्याचा आरोप केला आहे.

अमिषा पटेल वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही चेक बाऊन्स झाल्यामुळे भोपाळ कोर्टात तिच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

SCROLL FOR NEXT