'लौट कर मैं ना जाऊंगा खाली' म्हणत 'या' गायकाने केले इन्स्टाग्रामला अलविदा!

प्रसिद्ध गायक अदनान सामीने आपल्या एका निर्णयाने त्याचा चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने अचानक इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.
Adnan Sami has deleted all his Instagram posts
Adnan Sami has deleted all his Instagram postsSaam Tv

मुंबई : प्रसिद्ध गायक अदनान सामीने(Adnan Sami) आपल्या एका निर्णयाने त्याचा चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने अचानक(Instagram) इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. या पोस्टद्वारे अदनान सामीने सांगितले की, त्याने सोशल मीडियाला अलविदा केला आहे. होय, आता अदनान सामीने इन्स्टाग्रामला रामराम म्हटले आहे. मात्र, त्यामागचे कारण त्याने स्पष्ट केलेले नाही. अशा परिस्थितीत गायकाने हे पाऊल का उचलले हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Adnan Sami has deleted all his Instagram posts
Tehran : 'सम्राट पृथ्वीराज'नंतर 'या' लूकमध्ये दिसणार 'विश्वसुंदरी'

इतकंच नाही तर, अदनानने इन्स्टाग्राम सोडल्याची माहिती देत ​​त्याच्या सर्व जुन्या पोस्टही डीलीट केल्या आहेत. त्याच्या सर्व पोस्ट इन्स्टाग्रामवरून गायब झाल्या आहेत. अदनानचे खाते पूर्णपणे रिक्त झालेले पाहून चाहत्यांना सुरुवातीला वाटले की, तांत्रिक अडचणीमुळे झाले असेल. पण, त्याची गुडबाय पोस्ट पाहून चाहत्यांना त्याने इन्स्टाग्रामलाच बाय-बाय म्हटलंय, याचा अंदाज यायला वेळ लागला नाही.

Adnan Sami has deleted all his Instagram posts
Koffee With Karan : सामंथाला उचलून घेत 'खिलाडी' अक्षय कुमारची धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हिडिओ

दुसरीकडे, अदनानच्या चाहत्यांना त्याने असे का केले यामागील कारण समजलेले नाही. म्हणून अनेक यूजर्स अदनानला कमेंट्सद्वारे इन्स्टाग्राम अकाउंट बंद करायचा निर्णय का घेतला? असे प्रश्न विचारत आहेत. चाहत्यांच्या आश्चर्याचे एक कारण म्हणजे याआधी अदनान सामी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होता. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देणे असो, मैफली असो किंवा कौटुंबिक सुट्टी असो, अदनान आपल्या चाहत्यांशी प्रत्येक गोष्ट शेअर करत होता.

भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशातील अदनानचे चाहते सोशल मीडियावर त्याला फॉलो करतात. भारतात त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अदनान सामी त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत होता. त्याने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे अनेकांना प्रेरणा दिल्या होत्या. इंस्टाग्रामवर अदनान सामीला ६७२ हजारांहून अधिक यूजर्स फॉलो करतात. अशा स्थितीत अदनान सामीने आपल्या सर्व पोस्ट डिलीट करणे लोकांसाठी खूप धक्कादायक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com