Alia Bhatt Deepfake Viral Video  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Deepfake Video : आलिया भट्ट पुन्हा एकदा डीपफेकची शिकार, अभिनेत्रीचा नवा ट्रेंडिंग व्हिडीओ होतोय व्हायरल

Alia Bhatt Deepfake Viral Video : सध्या AI तंत्रज्ञानाचा वापर करत डिपफेक व्हिडीओंचा वापर सर्वाधिक केला जात आहे. अशातच सोशल मीडियावर आलिया भट्टचा पुन्हा एक डिपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी डीपफेक व्हिडीओचा बळी ठरत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा सुद्धा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर GRWM नावाचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमधील आलियाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. GRWM म्हणजे (Gate Ready With Me) होय. तिचा हा ट्रेंडवाला व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आलिया भट्टचा हा डीपफेक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. Unfixface नावाच्या इन्स्टा आयडी वरून आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडीओवर ७ लाख ४३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. ही व्हिडीओ मुलींसाठींच्या फॅशन रिलेटेड आहे. ब्लॅक हार्ट आणि पुढे कुर्ता असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केलेला आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आल्या आहेत. "AI जितकं चांगलं आहे, तितकंच धोकादायकही आहे.", "ही आलिया भट्ट नाही", "हे फार धोकादायक आहे." असं म्हणत अनेक युजर्सने AIच्या डीपफेक व्हिडीओवर विरोध दर्शवला जात आहे. यापूर्वी आलिया भट्टचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. अश्लील हावभाव करत असलेला व्हिडीओ पूर्वी व्हायरल झाला होता. डीपफेक व्हिडीओचा बळी आलिया भट्टसह रणबीर सिंह, रश्मिका मंदान्ना, नोरा फतेही, अक्षय कुमार, सोनू सूद, कतरिना कैफ, काजोल देवगण आणि आमिर खानसह अनेक सेलिब्रिटी डीपफेक व्हिडीओची शिकार झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT