Aishwarya Rai Bachchan At Cannes Festival 2024 Instagram
मनोरंजन बातम्या

Cannes Festival 2024 : हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याची कान्स रेड कार्पेटवर रुबाबात एन्ट्री, लेक आराध्याचं होतंय कौतुक

Aishwarya Rai Bachchan News : कान्स २०२४ मधीलही ऐश्वर्याच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधलेय. अशातच सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लूकचे कौतुक होत असून तिची लेक आराध्याचेही सध्या कौतुक होत आहे.

Chetan Bodke

आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा समजला जाणाऱ्या Cannes Film Festival ला १४ मे पासून सुरूवात झालेली आहे. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी उपस्थिती लावलेली आहे. बुधवारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हल साठी रवाना झाली. यावेळी तिच्या हाताच्या बँडेजने सर्वांचेच लक्ष वेधले. दरवर्षी वेगवेगळ्या खास लूकमुळे ऐश्वर्या चर्चेत असते. तिच्या लूकची कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चा असते. कान्स २०२४ मधीलही तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधलेय. अशातच सोशल मीडियावर ऐश्वर्याचा लूक समोर आला आहे.

ऐश्वर्यासोबत कान्स फेस्टिव्हलसाठी तिची लेक आराध्याही उपस्थित होती. ऐश्वर्याचा फ्रॅक्चर झालेल्या हातानं सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तिच्या फ्रॅक्चर हाताची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्रीने कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ब्लॅक अँड व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे. त्यावर गोल्डन कलरची ज्वेलरी आणि इअरिंग्स अशा लूकमध्ये दिसली. यावेळी ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर झालेला दिसला. अशातच आराध्या ही आईची काळजी घेत होती. त्यामुळे तिचं सध्या कौतुक होत आहे.

यावेळी आराध्याने अगदीच साधा सिंपल लूक कॅरी केलेला होता. तिच्या सिंपलनेसने चाहत्यांचे हृदय जिंकले आहे. त्यासोबतच ती आईची काळजी घेत असल्यामुळे चाहते तिचे तुफान कौतुक करीत आहेत. यापूर्वी कान्स फेस्टिव्हलला नमिता थापर, कियारा अडवाणी, शोभिता धुलिपाला, उर्वशी रौतेला यांनी सहभाग घेतला आहे. या फेस्टिव्हलची सुरूवात १४ मे पासून झाली असून २५ मे रोजी या फेस्टिव्हलची सांगता होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT