Vikram Gokhale Last Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sur Lagu De Poster: विक्रम गोखलेंचा अखेरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार, 'सुर लागू दे'चा पोस्टर प्रदर्शित

Vikram Gokhale Poster Released: रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Vikram Gokhale Last Movie

रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी निधन झाले. विक्रम गोखले यांच्या निधनाने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक न भरुन निघणारी पोकळी निर्माण झालीय. विक्रम गोखले जरीही आज आपल्यात नसले तरी, त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते कायमच आपल्या स्मरणात आहेत. लवकरच त्यांचा अखेरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रविण विजया एकनाथ बिर्जे दिग्दर्शित ‘सुर लागू दे’ हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Marathi Film)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रतिकूल परिस्थितीही आपल्या वाट्याला आलेलं काम चोख बजावणं हा अतिशय दुर्मिळ गुण विक्रम गोखले यांच्या ठायी होता. याच बळावर त्यांनी अखेरच्या काळात बऱ्याचदा प्रकृती अस्वस्थ असतानाही आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी मोठ्या जिद्दीनं कॅमेरा फेस केला होता. त्यातीलच एक चित्रपट. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला. पोस्टर लॉंचिंग कार्यक्रमाला पत्नी वृषाली विक्रम गोखले यांच्या मुख्य उपस्थितीत अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते ‘सुर लागू दे’च्या नवीन पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. (Actor)

ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक 'किंग' कुमार यांनी 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली असून रतीश तावडे, अश्विन पांचाळ आणि देवांग गांधी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. गोखलेंची अखेरची कलाकृती ठरलेल्या 'सूर लागू दे' या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी केलं आहे. सुहासिनी मुळ्ये आणि विक्रम गोखले या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांची जोडी चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्रित आली आहे. (Vikram Gokhale)

चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं असून, संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. मालिकांसोबत मराठी चित्रपटांमध्ये झळकलेली रीना मधुकर आणि 'कलियों का चमन...' फेम मेघना नायडू या चित्रपटातील सरप्राईज पॅकेज आहेत.

त्यांच्या जोडीला आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा न्याते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे, अमोघ चव्हाण, औदुंबर बाबर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Entertaiment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT