Saif Ali Khan Devara First Look Shared On Social Media Twitter
मनोरंजन बातम्या

Devara Look: लांबसडक केस अन् नजरेत तिरस्कार...; सैफ अली खानचा 'देवरा'तील फर्स्ट लूक प्रदर्शित

Chetan Bodke

Saif Ali Khan Devara First Look Shared On Social Media: नेहमीच आपल्या लूक मुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहिलेल्या सैफ अली खानचा आज ५३ वा वाढदिवस आहे. मध्यंतरी, ‘आदिपुरूष’ चित्रपटातील रावणाच्या भूमिकेमुळे प्रचंड ट्रोल झालेल्या सैफचा लवकरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एक नवा चित्रपट येत आहे. अनेकदा अभिनयामुळे ट्रोल झालेला सैफ पुन्हा एकदा चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी सैफच्या आगामी 'देवरा' (Devara) या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या लूकमध्ये सैफचे लांबसडक केस दिसत असून तो सीरियस मोडमध्ये पाहायला मिळत आहे. 'देवरा'मध्ये सैफ भैराच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफचा हा फर्स्ट लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्याचा एक हटका अंदाज पाहायला मिळत असून चाहते या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.

चित्रपटात सैफ अली खानसोबत 'देवरा' चित्रपटात ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) आणि जान्हवी कपूरदेखील (Janhvi Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्याचा हा फर्स्ट लूक त्याच्या वाढदिवशी प्रदर्शित झाला असून अभिनेत्याचा लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. अभिनेत्याचा हा लूक प्रदर्शित होताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Celebrity)

कोरटाला सिवा दिग्दर्शित 'देवरा' चित्रपट पुढच्या वर्षी ५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी कपूर टॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून ती ज्यूनियर एनटीआरच्या विरोधातील तिचे पात्र दिसणार आहे. तर ज्यूनियर एनटीआर आणि सैफ अली खान देखील एकमेकांच्या विरोधातच दिसणार आहे. सैफ अली खानचा हा पोस्टर पाहून सिनेप्रेमींना आणि सैफच्या चाहत्यांना या बहुचर्चित चित्रपटाची कमालीची उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT