Rajinikanth Movie Lal Salaam Film Trailer Released You Tube
मनोरंजन बातम्या

ॲक्शन स्पोर्ट्स ड्रामाने भरलेला Lal Salaam Trailer Out; रजनीकांत यांच्यासोबत वर्ल्डकप विजेता कर्णधारही झळकणार

Rajinikanth Movie Trailer Released: रजनीकांत, विक्रांत आणि विष्णू विशाल यांच्या आगामी 'लाल सलाम' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Lal Salaam Rajinikanth as Moideen Bhai

रजनीकांत, विक्रांत आणि विष्णू विशाल यांच्या आगामी 'लाल सलाम' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आहे.

रजनीकांत आता 'जेलर'नंतर 'लाल सलाम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतने केले आहे. स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना ॲक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. (Tollywood)

नुकतंच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. सर्वच कलाकारांच्या अभिनयाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होताना दिसते. चित्रपटामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांनी एका गँग लीडरची भूमिका साकारली आहे. धार्मिक सलोखा आणि जातीयवाद यांसारखे मुद्देही चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

तामिळ भाषेमध्ये चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून २ मिनिट २८ सेकंदाच्या ह्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधलेय. ट्रेलरमध्ये राजकारणात सत्ता, धर्म, क्रोध या गोष्टी कशा प्रकारे परिणाम करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा मोईद्दीन भाईच्या जीवनासंबंधीत असल्याचे दिसत आहे. (Bollywood Film)

हार्ड हिटिंग स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रजनीकांत यांच्यासोबत क्रिकेटर कपिल देव यांचीही झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये एका दृश्यात रजनीकांत आणि क्रिकेटर कपिल देव एकत्र बसलेले दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत इतर लोकंही दिसत आहेत. (Bollywood News)

मैदानामध्ये माजी क्रिकेटर कपिल देव खेळाडूंना प्रशिक्षण देताना दिसत आहेत. चित्रपटात सुपरस्टार रजनीकांतसह विष्णू विशाल, विक्रांत, विग्नेश, लिविंगस्टन, सेंथिल, जीविता, केएस रविकुमार आणि थंबी रमैय्या यांचीही भूमिका आहे. तर क्रिकेटर कपिल देव पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. (Actor)

ॲक्शन आणि स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार आहे. 'लाल सलाम' चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर रिलीज होण्याच्या अवघ्या ४ दिवस आधी ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. तर ए. आर. रहमानचे संगीत दिले आहे.

रजनीकांतच्या कामाबद्दल सांगायचे तर, गेल्या वर्षी रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. 'जेलर' चित्रपटानंतर रजनीकांत यांचा 'लाल सलाम' चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यासोबतच रजनीकांत 'लाल सलाम'नंतर 'वेट्टीयान' (Vettaiyan) चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT