R Madhavan With Son Vedaant Won 5 Gold Medals  Saam TV
मनोरंजन बातम्या

R Madhavan's Son Won 5 Gold Medals: आर माधवनच्या मुलाने पुन्हा उंचावली भारताची शान; ५ गोल्ड मेडल जिंकल्याने बापाने केली खास पोस्ट

Actor R Madhavan's son Vedaant Won Gold: वेदांत माधवन याने जलतरण स्पर्धेत भारतासाठी 5 सुवर्णपदके जिंकली आहेत.

Pooja Dange

Actor R Madhavan's Post: बॉलिवूड अभिनेता आर माधवन त्याच्या 'रेहाना तेरे दिल में' या चित्रपटातील व्यक्तिरेखेमुळे साऱ्यांची मने जिंकली होती. आर माधवन वेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आता त्याच्या मुलाने देखील भारतीयांची मने जिंकली आहेत. आर माधवन यांचा मुलगा वेदांत याने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे.

अभिनयापासून दूर जात वेदांतने खेळात करियर बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने त्याच्या दमदार कामगिरीने देशाचा गौरव केला आहे. आर माधवनने मुलाच्या विजयाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

अभिनेता आर माधवनला त्याच्या मुलाचं अखूप अभिमान आहे. त्याचा मुलगा वेदांत माधवन याने जलतरण स्पर्धेत भारतासाठी 5 सुवर्णपदके जिंकली आहेत. या चॅम्पियनशिपदरम्यानचे मुलाचे काही फोटो शेअर करून माधवानने आनंद व्यक्त केला आहे.

वेदांतने 58 व्या MILO/MAS मलेशिया इनव्हिटेशनल एज ग्रुप जलतरण स्पर्धेतही भाग घेतला होता. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये वेदांत भारताचा तिरंगा आणि मेडलसोबत पोज देताना दिसत आहे.

एका फोटोमध्ये माधवनची पत्नी आणि वेदांतची आई सरिता बिर्जेही आपल्या मुलाच्या विजयावर खूप आनंदी दिसत आहेत. मुलाने जिंकलेली सर्व पदके त्याच्या गळ्यात आहेत. तसेच त्याच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद दिसत आहे. (Entertainment News)

फोटो शेअर करताना आर माधवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्व शुभेच्छांसह वेदांताला भारतासाठी ५ गोल्ड (५० मी, १०० मी, २०० मी, ४०० मी आणि १५०० मी) सह २ पीबी मलेशियन एज ग्रुप चॅम्पियनशिप , २०२३ मध्ये मिळाली आहेत. ही स्पर्धा या आठवड्याच्या शेवटी आयोजित होती.

आर माधवनच्या या पोस्टवर, त्याचे कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त, कलाकार-राजकारणी खुशबू सुंदरने लिहिले, “अभिनंदन मॅडी.. वेदांतला खूप प्रेम. गेल्या काही वर्षांत वेदांत माधवनने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विजयांची नोंद करून देशाचे नाव उंचावले आहे. आर माधवनला प्रत्येक वेळी मुलाच्या विजयाचा आनंद सर्वांसोबत शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT