Akhil Bharatiya Natya Parishad Election Result: अखिल भारतीय नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक काल म्हणजे रविवारी १६ एप्रिलला पार पडली आहे. सध्यांकाळी ५:३० पर्यंत मतदान सुरू होते. त्यानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली.
रात्री उशिरा पर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणी झाली. पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा निकाल जाहीर करण्यात आला. या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचा विजय झाला आहे.
मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी ८ जागांवर दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले तर उर्वरीत जागांवर प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.
अखिल भारतीय नाट्य परिषदची यावर्षीची निवडणूक दामले विरुद्ध कांबळी अशी होती. या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप असल्याची देखील चर्चा यावेळी होत होती. त्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पण अखेर प्रशांत दामले यांनी बाजी मारत नाट्य परिषदेवर विजय मिळवला.
मुंबई मध्यवर्तीत शाखेत एकूण १३२८ इतके मतदान झाले. त्यापैकी माटुंगा यशवंत नाट्य मंदिर येथे १२४५ आणि गिरगांव येथे ८३ मतदान झाले. तर मुंबई उपनगर शाखा (मुलुंड - बोरिवली- वसई) यांचे एकूण ७३० मतदान झाले.
प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी नाटक समूहा'चा ८/२ असा विजय झाला. यामध्ये प्रशांत दामले, विजय केंकरे, विजय गोखले, सयाजी शिंदे, सुशांत शेलार, अजित भुरे, सविता मालपेकर, वैजयंती आपटे भरघोस मतांनी विजयी झाले. तर उर्वरित दोन उमेदवार हे आपलं पॅनल मधून विजयी झाले असूनह यामध्ये स्वतः प्रसाद कांबळी आणि अभिनेत्री सुकन्या मोने विजयी झाल्या.
अ. भा. मराठी नाट्य परिषद पंचवार्षिक निवडणूक २०२३-२८
मध्यवर्ती शाखा - विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी
१) प्रशांत दामले (७५९)
२) विजय केंकरे (७०५)
३) विजय गोखले (६६४)
४) सयाजी शिंदे (६३४)
५) सुशांत शेलार (६२३)
६) अजित भुरे (६२१)
७) सविता मालपेकर (५९१)
८) वैजयंती आपटे (५९०)
९) सुकन्या कुलकर्णी-मोने (५६७)
१०) प्रसाद कांबळी (५६५)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.