Dharmaveer 2 News Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2 Trailer: प्रतीक्षा संपली! 'धर्मवीर -२'चा अंगावर काटा आणणारा दुसरा ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिलात का?

Dharmaveer 2 Movie Release Date: 'जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा' अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर 'धर्मवीर - २' या चित्रपटात उलगडणार आहेत.

Priya More

Marathi Movie Dharmaveer 2: मराठमोळा अभिनेता प्रविण तरडे दिगदर्शित बहुचर्चित 'धर्मवीर 2' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे आतापर्यंत रिलीज झालेले पोस्टर, टीझर, ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. प्रेक्षक हा चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला.

'जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा' अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर 'धर्मवीर - २' या चित्रपटात उलगडणार आहेत. हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकताच रिलीज झालेला चित्रपटाचा दुसरा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आणखी वाढली आहे.

'धर्मवीर -२' या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. धर्मवीर २ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन प्रवीण तरडे यांनी केले आहे. अभिनेता प्रसाद ओक आणि क्षितीश दाते हे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची तर क्षितीज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

संगीतकार चिनार महेश आणि अविनाश विश्वजित यांनी 'धर्मवीर -२' या चित्रपटातील गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. धर्मवीर २ च्या दुसऱ्या ट्रेलरमधून दिघेसाहेबांची विविध रुपं पाहायला मिळत आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघेसाहेब या ट्रेलरमध्ये दिसतात. त्याशिवाय या ट्रेलरमधून हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. त्यामुळे हिंदुत्त्वाविषयी थेट आणि आक्रमक भूमिका घेणारे दीघेसाहेब यात दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT