Devara Movie : 'देवरा' चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार? नव्या अपडेटनं चाहत्यांची वाढवली धकधक

Devara Movie New Update: साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर त्याच्या आगामी चित्रपटातील गाण्यामुळे सर्वत्र चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच देवरा या चित्रपटाचं तिसरे गाणे रिलीज झाले. या गाण्यामधील जान्हवी कपूर आणि ज्युनिअर एनटीआरच्या डान्सचं सर्व प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं सोशल मीडियावर हे गाणे हिट ठरले आहे.
song
Devara Movie canva
Published On

साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याच्या 'देवरा' चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 'देवरा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटांमधील गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.'देवरा' चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआरसोबत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सुद्धा दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटामधील Daavudi हे गाणं प्रदर्शित झालं होतं. हे गाणं यूट्यूवर प्रदर्शित झाल्यानंतर अगदी ३ तासांमध्ये ट्रेडिंग गाण्यांच्या यादीत या गाण्याची नोंद झाली होती. यूट्यूवर या गाण्याला ६ लाख ७३ हजार ३०१ व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचे प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुक होताना दिसतंय.

RRR चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर ज्युनिअर एनटीआरने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. देवरा या चित्रपटामधील त्याचं पात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. RRR चित्रपटामधील नाटू नाटू हे गाण प्रचंड व्हायरल झालं होत. तर या गाण्यावर अनेक कलाकारांनी डान्स केला होता. ज्युनिअर एनटीआरच्या देवरा या चित्रपटाबद्दल १० सप्टेंबरला एक नविन अपडेट समोर येणार आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, देवरा या चित्रपटाचा ट्रेलर १० किंवा ११ सप्टेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सध्या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीच अपडेट देण्यात आली नाहीये. चित्रपटाच्या ट्रेलरला फायनल टच देण्याचे काम सुरू आहे. या चित्रपटामध्ये अपल्याला फुल ऑन अ‍ॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. चित्रपटामधील ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवीच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळताना दिसतेय.

देवरा या चित्रपटासोबत ज्युनिअर एनटीआरचे २ नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला याणार आहेत. लवकरच ज्युनियर एनटीआर आपल्याला YRF स्पाई यूनिवर्सच्या War 2 या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआरने ऋतिक रोशन विरुद्ध खलनायकाची भूमिका निभावलीय. या चित्रपटानंतर ज्युनियर एनटीआरच्या ‘सलार 2’ या चित्रपटाची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Edited By: Nirmiti Rasal

song
Jr NTR आणि Janhvi Kapoor च्या Devara मधील रोमँटिक गाणं रिलीज, गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com