Anushka Sharma : विराट कोहलीशिवाय अनुष्का भारतात परतली, 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

Anushka Sharma Back To India : अनुष्का शर्मा भारतात परतली आहे. ती आपल्या कुटुंबाशिवाय भारतात आली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नुकतीच अनुष्का एका फूड प्रोग्राममध्ये स्पॉट झाली.
Anushka Sharma Back To India
Anushka SharmaSAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्री आणि चित्रपटापासून दूर होती. ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त असताना दिसली. अनुष्का अकायच्या जन्मापासून लंडनमध्ये होती. ४ सप्टेंबरला सकाळी अनुष्का एअरपोर्टवर स्पॉट झाली. मात्र तिच्यासोबत पती विराट कोहली (virat kohli ) आणि तिची मुले वामिका, अकाय दिसले नाही.

भारतात परतल्यानंतर तिने पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने तिचे कमाल फोटो शेअर केले आहेत. वामिकाच्या जन्मापासून अनुष्का शर्मा चित्रपटांपासून दूर आहे. तर, अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा आपल्या मुलांसोबत लंडनमध्ये होती. मध्ये ती आयपीएल दरम्यान स्पॉट झाली होती.

अनुष्का शर्मा ४ सप्टेंबरला सकाळी भारतात पोहोचली. यावेळी ती एका खास लूकमध्ये दिसली. फुल ब्लॅक ड्रेसिंगमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत होती. भारतात परतल्यानंतर अनुष्का शर्माने पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अनुष्का शर्माने तिचे खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ती ब्लू शॉर्ट टॉप आणि रेड ट्राउजरमध्ये पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीने या फोटोंना छान कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, हॅपी गो रेड-वाय! हा लूक तिने एका ब्रँड प्रमोशनसाठी केला होता. स्लर्प फार्म नावाचा हा लहान मुलांच्या फूड आइटम ब्रँड आहे. अभिनेत्री खूप दिवसांपासून याचे प्रमोशन करत आहे.

स्लर्प फार्म ही कंपनी लहान मुलांचे पौष्टिक फूड आइटम बनवते. ज्यात नाचणी, ओट्स, चॉकलेट, बाजरी आणि केळीपासून बनवलेले कुकीज यांचा समावेश असतो. हा पॅकेज फूड ब्रँड 2016 मध्ये सुरू झाले. ही कंपनीच्या मेघना नारायण आणि शौरवी मलिक चालवतात. तर या फूडना अनुष्का शर्मा प्रमोट करत आहे. 2022 मध्येच ती या ब्रँडशी जोडली गेली. अनुष्का शर्मा स्लर्प फार्मची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. याच्या संबंधित कार्यक्रमासाठी अनुष्का शर्मा भारतात आली आहे.

सध्या सोशल मिडियावर अनुष्का शर्माचा एक क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका छोट्या मुलीसोबत संवाद साधत आहे. ती मुलगी त्याला सांगताना दिसत आहे की, ती अनुष्काची मोठी फॅन आहे. तिने अनुष्का शर्माच्या एका गाण्यावरही परफॉर्म केले आहे. या संवादानंतर अनुष्का त्या गोंडस मुलीसोबत सेल्फी काढते.

Anushka Sharma Back To India
Sonu Sood : 'मसिहा' पुन्हा धावला! पुरानं संसार उद्ध्वस्त केले, सोनू सूदनं सावरलं!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com