Piyush Ranade And Suruchi Adarkar Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Piyush Ranade Interview: सुरुचीसोबत लग्न केल्यानंतर पियुषची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “चांगल्या आणि वाईट काळात...”

Piyush Ranade And Suruchi Adarkar Wedding: अभिनेता पियुष रानडेने सुरुचीसोबत लग्न केल्यानंतर एका मुलाखतीतून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Piyush Ranade Interview

मराठी मनोरंजनसृष्टीत एकापोठपाठ एक सेलिब्रिटी प्रेमाची कबुली देत विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतंच 'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने (Suruchi Adarkar) अभिनेता पियुष रानडेसोबत (Piyush Ranade) ६ डिसेंबर रोजी गुपचूप लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले आहे. नुकतंच अभिनेता पियुष रानडेने सुरुचीसोबत लग्न केल्यानंतर एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली आहे.

तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलेला पियुष रानडे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. नुकतंच त्याने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली आहे. “तुमच्या चांगल्या किंवा वाईट वेळी आपल्यासोबत असलेले कुटुंबीय आणि मित्रपरिवार आपल्याला सर्वांसोबत संवाद साधण्याची अनुमती देतात. आणि तुम्ही सांगू शकता की, ते तुमच्यासाठी आनंदी आहेत.” असं तो मुलाखतीत म्हणाला आहे. (Marathi Film)

सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी लग्न केल्याचे कळताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पियुष आणि सुरुची यांनी 'अंजली' मालिकेमध्ये एकत्र होते. त्या मालिकेपासून हे दोघेही कोणालाही न कळता डेट करत होते. लग्नाचे फोटो शेअर करताना, 'आनंदाचा दिवस' असे कॅप्शन दिले आहे. तर सुरुचीने पीएसआयलव्ह हा हॅशटॅग वापरत फोटो शेअर केला.

पियुष रानडेचं हे तिसरं लग्न असून त्याने शाल्मली तोळेसोबत पहिलं लग्न केलं होतं. पण काहीच वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. दुसरं लग्न अभिनेत्री मयुरी वाघसोबत पियुषने लग्नगाठ बांधली होती. पण, हे लग्नही फार काळ टिकलं नाही. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT