Makrand Anaspure Saam Tv
मनोरंजन बातम्या

Makrand Anaspure Movie: मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका; दिवाळीत होणार चित्रपट प्रदर्शित

Makrand Anaspure Movie: मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत.

Manasvi Choudhary

मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ‘राजकारण गेलं मिशीत’ या धमाल चित्रपटानंतर यावेळी ‘मूषक आख्यान’ या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात त्यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर लाँच आणि टीझर रिलीजचा सोहळा श्री सिद्धिविनायक मंदिरात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला.

‘देशमाने डिजी व्हिजन’द्वारे प्रस्तुत ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने यांनी केली आहे. मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत. चित्रपटाचे लेखक हेमंत एदलाबादकर आहेत. छाया दिग्दर्शन सुप्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक सुरेश देशमाने यांचे आहे. हर्षदा पोरे कल्लुरकर यांनी लिहिलेल्या गीतांना अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गाणी खूपच श्रवणीय झाली आहेत. सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण असणार आहे.

संकलन अनंत कामत तर पार्श्वसंगीत अभिजित हेगडे यांचे आहे. व्हीएफएक्स अरविंद हतनुरकर तर साउंड डिझाईनची जबाबदारी मयूर वैद्य यांनी सांभाळली आहे सह-छायांकन जगदीश देशमाने यांचे आहे. ‘मूषक आख्यान’ चित्रपटात सबकुछ मकरंद अनासपुरे आहेत, पण त्यांच्यासोबत भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव यांच्या लक्षणीय भूमिका आहेत.

पोस्ट प्रॉडक्शन रश मिडिया, अन्वय उत्तम नायकोडी, रंगभूषा- कुंदन दिवेकर, वेशभूषा- माधुरी मोरे यांचे आहे. या चित्रपटात अर्कचित्रांचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे आणि ही अर्कचित्रे नागपूरचे व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT