Entertainment News
Yek Number MovieSaam Tv

Yek Number Movie Review: 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो...,' आता आवाज फक्त ‘येकच’..! रिव्ह्यू वाचा

Yek Number Movie: 'येक नंबर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Published on

'येक नंबर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सणासुदीचे दिवसांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्याने विकेंडमध्ये येक नंबर चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे स्क्रिनींग देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता ‘येक नंबर’ मोठा धमाका करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Entertainment News
Nikki Tamboli: बाईssss बाईssss सारखं का बोलते? निक्कीने सांगितला पुण्यातल्या मैत्रिणीचा 'तो' किस्सा, पाहा Video

येक नंबर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची चर्चा रंगली होती. यानंतर चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला. चित्रपटाची भव्यता ट्रेलर, गाण्यांमधून दिसतच आहे. प्रेक्षकही या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. चित्रपटाचा पहिला भाग काहींना आवडत आहे तर काहींना पूर्वार्ध अधिक भावला आहे. अनेकांनी धैर्यच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तर अनेकांना तेजस्विनी पंडितची धडाडीची व्यक्तिरेखा प्रचंड आवडली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची विचारधारा सांगणारा हा चित्रपट चांगलीच झेप घेत आहे. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम ठेवली आहे. महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाने आवर्जून पाहावा, असा हा चित्रपट आहे.

झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, 'येक नंबर'चे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Entertainment News
Ankita Walawalkar: अंकिताने लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना दिली; कोकण हार्टेड गर्लने कारणही सांगितले, पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com