Mahesh Manjrekar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mahesh Manjrekar : "प्रेम, साथ आणि नात्याची गाठ..."; महेश मांजरेकर यांच्या 'देवमाणूस' चित्रपटाचे रोमँटिक गाणे रिलीज, पाहा VIDEO

Devmanus Movie New Song Release : महेश मांजरेकर यांच्या 'देवमाणूस' चित्रपटातील नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे एक रोमँटिक गाणे आहे.

Shreya Maskar

'देवमाणूस' (Devmanus Movie) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटातील नवीन रोमँटिक गाणे 'सोबती' प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मैत्रीला अर्पण केलेले हे हृदयस्पर्शी गीत आहे. 'सोबती' हे या चित्रपटातील तिसरे गाणे असून याआधी 'पांडुरंग' या भावस्पर्शी गाण्याने आणि 'आलेच मी' झगमगत्या लावणीने रसिकांची मने जिंकली आहेत.

'सोबती' (Sobati ) हे गाणे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांचा भावनिक प्रवास आणि त्यांच्यातील नात्याची गोडी सुंदरपणे टिपणारे आहे. या गाण्याला शेखर रावजियानी आणि आर्या आंबेकर यांनी गायले आहे. या गाण्याला रोहन-रोहन या जोडीचे संगीत दिले आहे. तर गीतकार प्रशांत मडपुवार यांच्या शब्दांना रोहन प्रधान यांनी काही अतिरिक्त ओळी दिल्या आहेत.

आपला अनुभव सांगताना शेखर रावजियानी म्हणतात की, "जेव्हा रोहन-रोहन यांनी मला 'सोबती'साठी संपर्क केला. तेव्हा या गीतातील साधेपणा आणि भावनिकता मला लगेच भावली. हे गाणे साकारताना अतिशय छान अनुभव आला आणि आम्हाला आशा आहे की प्रेक्षकही याच्या गाभ्याशी जोडले जातील."

'सोबती' गाण्याबद्दल आर्या आंबेकर म्हणते की, "शेखर सरांसोबत गायला मिळणं आणि रोहन-रोहन यांच्यासोबत काम करणं हे स्वप्नवत होतं. 'सोबती' हे अतिशय प्रेमळ आणि मनापासून गायलेलं गीत आहे. आम्ही यात जेवढं प्रेम ओतलं आहे, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे. हीच इच्छा आहे." 'देवमाणूस' हा चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT