Sayali Sanjeev- Rishi Saxena : "काळ स्वतः जागा होतोय..."; 'समसारा' च्या पोस्टरनं वेधलं लक्ष, सायली संजीव- ऋषी सक्सेना जोडी पुन्हा एकत्र

Samsara The Womb New Poster Release : 'काहे दिया परदेस' फेम जोडी ऋषी सक्सेना आणि सायली संजीव पुन्हा एकत्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यांच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
Samsara The Womb New Poster Release
Sayali Sanjeev- Rishi SaxenaSAAM TV
Published On

'काहे दिया परदेस' फेम जोडी ऋषी सक्सेना (Rishi Saxena) आणि सायली संजीव (Sayali Sanjeev) पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. त्यांची 'काहे दिया परदेस' ही मालिका खूपच गाजली होती. या मालिकेत त्यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती. आता ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चाहते यांच्या चित्रपटासाठी खूपच आतुर आहेत.

ऋषी सक्सेना आणि सायली संजीव यांचा 'समसारा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'समसारा' चित्रपट 20 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिशय धीरगंभीर असे टीजर पोस्टर लाँच करण्यात आले आहे.'समसारा' (Samsara The Womb ) चित्रपटाची निर्मिती पुष्कर योगेश गुप्ता यांनी केली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा सागर लढे यांनी सांभाळली आहे.

'समसारा' चित्रपटातील कलाकार

'समसारा' चित्रपटात सायली संजीव, ऋषी सक्सेनासोबतच पुष्कर श्रोत्री, डॉ गिरीश ओक, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. हे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'समसारा' चित्रपटाची कथा

'समसारा' चित्रपटाच्या पोस्टरला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "कोण देव कोण दानव, ओळखता येईल का कोण मानव? धोक्याचा वणवा पेटतोय, काळ स्वतः जागा होतोय, आम्ही येतोय.समसारा: द वूम्ब" या पोस्टरवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते ऋषी सक्सेना आणि सायली संजीव जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

Samsara The Womb New Poster Release
Jasmin Bhasin : चुलबुली जास्मिनची 'या' शोमध्ये एन्ट्री होणार, कॉमेडी कलाकारांसोबत करणार धमाल मस्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com