Sayali Sanjeev-Ashok Saraf: बाप-लेकीचं नातं! घट्ट मिठी अन् प्रेम...;सायली संजीव अन् अशोक मामांचा क्युट व्हिडिओ व्हायरल

Sayali Sanjeev-Ashok Saraf Cute Video: सध्या सोशल मीडियावर अशोक सराफ आणि सायली संजीवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यात सायली अशोक मामांना घट्ट मिठी मारताना दिसत आहे.
Sayali Sanjeev-Ashok Saraf
Sayali Sanjeev-Ashok SarafSaam Tv
Published On

मराठी चित्रपटसृष्टीतील हुरहुन्नरी कलाकार म्हणून अशोक सराफ यांनी ओळख आहे. अशोक मामा आपल्या अभिनयाने नेहमी सर्वांना खिळवून ठेवत असतात. अशोक मामांचा अशी ही जमवा जमवी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा प्रिमियर शो नुकताच पार पडला. या प्रिमियर शोचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेत्री सायली संजीव अन् अशोक मामांचं घट्ट नात दिसत आहे.

Sayali Sanjeev-Ashok Saraf
Ashok Saraf: 'साधं राहणीमान अन्...' पद्मश्री अशोक सराफ यांची एकूण संपत्ती किती?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सायली संजीव ही अशोक मामांना मिठी मारताना दिसत आहे. या दोघांमध्ये काहीतरी गोड संवाद सुरु आहे. हे दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहे. या दोघांचा हा व्हिडिओ खूपच क्युट आहे. याचसोबत आणखी एक व्हिडिओत सायली संजीव अशोक मामा आणि निवेदिता सराफ (Ashok Saraf-Nivedita Saraf) यांच्यासोबत फोटो काढताना दिसत आहे. या दोघांच्या मध्ये उभी राहून ती फोटो काढत आहे. या व्हिडिओतून अशोक मामा आणि सायली संजीवचे बाप-लेकीचं (Father-Daughter Bond) नातं दिसत आहे. व्हिडिओत सायली अशोक मामांना काहीतरी सांगताना दिसत आहे. त्यांच्यातील हा गोड संवाद व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

अशोक मामांची मानलेली लेक (Sayali Sanjeev Ashok Mama Bond)

सायली संजीव आणि अशोक मामा यांच्या नात्याची नेहमी चर्चा असते. अशोक मामांनी सायली संजीवला लेक मानले आहे. सायलीदेखील अशोक मामांना पप्पा तर निवेदिता सराफ यांना मम्मी या नावाने हाक मारते. निवेदिता आणि अशोक मामांना मुलगी असती तर ती सायलीसारखी असती, असं त्यांना वाटतं. त्यामुळेच त्यांनी सायलीला मुलगी मानलं आहे.

Sayali Sanjeev-Ashok Saraf
Sayali Sanjeev: सायली संजीव आडनाव का लावत नाही? कारण ऐकून धक्का बसेल

अशोक सराफ यांचा अशी ही जमवाजमवी हा चित्रपट १० एप्रिल म्हणजे उद्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. लोकेश गुप्ते यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे, सुरेखा तळवळकर, पुष्कराज चिरपुटकर दिसणार आहेत.

Sayali Sanjeev-Ashok Saraf
Malaika Arora Warrant : आयटम गर्ल मलायका अरोराविरुद्ध कोर्टानं काढला वॉरंट; १२ वर्षे जुनं प्रकरण, बॉलिवूड अभिनेत्याशी कनेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com