Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांनी 'लाडकी बहीण' योजनेवर मांडले मत; म्हणाल्या, नुसते पैसे...

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात सुरू असलेल्या 'लाडकी बहीण' योजनेवर मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपले मत मांडले आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या, जाणून घ्या.
Ladki Bahin Yojana
Nivedita SarafSAAM TV
Published On

मराठी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) कायमच आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. त्या कोणतीही भूमिका खूप सुरेख पद्धतीने हाताळतात. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. सध्या निवेदिता सराफ यांचा 'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना पाहायला मिळत आहे. 'फसक्लास दाभाडे' चित्रपटात खूप तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. सध्या अभिनेत्री निवेदिता सराफ एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत.

अलिकडेच एका मिडिया मुलाखतीत 'लाडकी बहीण योजना' यावर आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. मुलाखतीत निवेदिता सराफ यांना विचारण्यात आले की, 'लाडकी बहीण' योजनेबद्दल तुम्हाला काय वाटते? यात काय सुधारणा हवी? यावर उत्तर देत निवेदिता सराफ म्हणाल्या, "'लाडकी बहीण योजना' ही चांगलीच आहे. गरजूंना आपले सरकार मदत करत आहे. ते गरजूंनपर्यंत पोहचले आहे. यासाठी 'लाडकी बहीण योजना' सुरू केल्याबद्दल सर्व भावांचे खूप आभार.

पुढे सुधारणाबद्दल बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या, "नुसते पैसे देण्यापेक्षा बहि‍णींना स्वतःच्या पायावर उभे कसे राहता येईल? याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण हे जास्त महत्त्वाचे आहे. फक्त पैसे देऊन प्रश्न सुटणार नाहीत. कारण पैसे हातात आले की खर्च होऊन जातात. त्यामुळे महिलांना योग्य रोजगार उपलब्ध करून देणे खूपच महत्त्वाचे आहे. " अशाप्रकारे 'लाडकी बहीण योजना' बद्दल आपले स्पष्ट मत निवेदिता सराफ यांनी मांडले.

अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा 'फसक्लास दाभाडे' चित्रपट काल (24 जानेवारी)ला रिलीज झाला आहे. या चित्रपटात खूप तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. निवेदिता सराफ सध्या 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

Ladki Bahin Yojana
Abhishek Rahalkar : मराठमोळा अभिनेता चढला बोहल्यावर; गुपचूप बांधली लग्नगाठ, अभिषेक रहाळकरची बायको आहे तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com