Jasmin Bhasin : चुलबुली जास्मिनची 'या' शोमध्ये एन्ट्री होणार, कॉमेडी कलाकारांसोबत करणार धमाल मस्ती

Laughter Chefs 2: अभिनेत्री जस्मिन भसीनची 'लाफ्टर शेफ्स 2'मध्ये एन्ट्री होणार आहे. यामागचे नेमकं कारण काय जाणून घेऊयात. पुन्हा जस्मिन आणि अली गोनी एकत्र पाहायला मिळणार आहेत.
Laughter Chefs 2
Jasmin BhasinSAAM TV
Published On

अभिनेत्री जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) नेहमी तिच्या कामामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. आजवर तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. आता जस्मिन भसीन एक नवीन शोमध्ये एन्ट्री घेणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जस्मिन भसीन लोकप्रिय शो 'लाफ्टर शेफ्स 2' (Laughter Chefs 2) आता पाहायला मिळणार आहे.

'लाफ्टर शेफ्स 2'मध्ये जस्मिन भसीनचा बॉयफ्रेंड अली गोनी (Aly Goni) देखील सहभागी आहे. आता अली गोनीच्या मागोमाग जस्मिन भसीनही शोमध्ये एन्ट्री घेणार आहे. जस्मिन भसीन शोमध्ये एका सदस्याच्या जागी येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गायक राहुल वैद्य शोचा निरोप घेत आहे. त्याच्या जागी आता जस्मिन भसीन पाहायला मिळणार आहे. राहुलला त्याच्या इतर कामांच्या कमिटमेंटमुळे हा शो सोडावा लागत आहे.

'लाफ्टर शेफ्स 2'च्या नवीन एपिसोडमध्ये रुबीना दिलैक आणि जस्मिन भसीनची जोडी पाहायला मिळणार आहे. जस्मिन आपल्या क्यूट अंदाजात प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाली आहे. ती आता किचनमध्ये कोणते पदार्थ बनवणार आणि कसा धुमाकूळ घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच आता पुन्हा एकदा एका शोमध्ये जस्मिन भसीन आणि अली गोनी एकत्र पाहायला मिळणार आहेत.

जस्मिन भसीन सोशल मीडियावर खूर सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आपल्या कामाचे अपडेट्सही ती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 8.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. जस्मिन भसीन आणि अली गोनी कायम आपल्या प्रेमामुळे चर्चेत असतात.

Laughter Chefs 2
Abhijeet Sawant : "नटीने मारली मिठी...", गाण्यावर अभिजीत सावंतचा जबरदस्त डान्स, VIDEO शेअर करत म्हणाला- स्टेजवर जाण्यापूर्वी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com