Abhijeet Sawant : "नटीने मारली मिठी...", गाण्यावर अभिजीत सावंतचा जबरदस्त डान्स, VIDEO शेअर करत म्हणाला- स्टेजवर जाण्यापूर्वी...

Abhijeet Sawant New Reel : 'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने एक भन्नाट डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
Abhijeet Sawant New Reel
Abhijeet Sawant SAAM TV
Published On

'इंडियन आयडल'चा (Indian Idol) विजेता अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिजीतनमे 'बिग बॉस मराठी 5'मुळे (Bigg Boss Marathi 5 ) खूप लोकप्रियता मिळाली आहे. तो 'बिग बॉस मराठी 5'चा उपविजेता ठरला. 'बिग बॉस' पासून अभिजीतच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. त्याचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे. तो कायम आपल्या गाण्याचे आणि विनोदी रील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.

नुकताच अभिजीत सावंतने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो सध्या ट्रेंडिंग असलेल्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. अभिजीतने "नटीने मारली मिठी" या गाण्यावर जबरदस्त डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. याला त्याने एक हटके कॅप्शन देखील दिले आहे. अभिजीत व्हिडीओमध्ये एका हॉटेल रुममध्ये डान्स करताना दिसत आहे.

अभिजीत "नटीने मारली मिठी" या गाण्याच्या हुकस्टेप करताना दिसत आहे. "अहो मित्रांनो, हे माझे सीक्रेट आहे...स्टेजवर येण्यापूर्वी माझे वॉर्मअप रुटीन...(अभिजीत सावंत, वॉर्मअप, स्टेजवर, पडद्यामागे, मैफल)" त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते रीलचा आनंद घेताना दिसत आहेत. अभिजीतने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

बिग बॉसमध्ये आपल्या गेम आणि स्पष्टवक्तेपणाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अभिजीत सावंत 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता देखील ठरला आहे. त्याच्या आवाजाने त्याने लोकांना वेड लावले आहे. अभिजीतने अलिकडेच 'बिग बॉस मराठी 5' सूरज चव्हाणसोबत एक भन्नाट रील शेअर केली होती. ज्यात दोघे सूरजचा आगामी चित्रपट 'झापुक झुपूक'वर भन्नाट डान्स करताना दिसले.

Abhijeet Sawant New Reel
Samantha Ruth Prabhu : समांथा पुन्हा प्रेमात? रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत तिरुपती मंदिरात स्पॉट, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com