Shruti Kadam
सारेगमप मराठीच्या लिटिल चॅम्प्स या पर्वातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आर्या आंबेकर एक उत्तम गायिका आहे.
आर्याने साडेपाच वर्षाची असताना आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या “ती सध्या काय करते” या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली.
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटाचे टायटल सॉन्ग आर्याने गायले असून ते प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरले आहे.
आर्या ‘हृदयात वाजे समथिंग’ , ‘बाई गं’, ‘कितीदा नव्याने’ यांसारख्या अनेक गाण्यांमधून प्रसिद्धझोतात आली आहे.
आर्याने आतापर्यंत ८ मालिकांचे शीर्षक गीत गायले आहे.
आर्याला १५ पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
आर्या आंबेकरचे २०२४ सालचे मानधन ३३१.६ डॉलर्स म्हणजे २९,९६,६२६ रुपये असल्याचा अंदाज आहे.